Lokmat Money > बिझनेस न्यूज > Flipkart सोबत सुरू करा व्यवसाय; महिन्याला हजारो-लाखोंची कमाई, जाणून घ्या प्रोसेस...

Flipkart सोबत सुरू करा व्यवसाय; महिन्याला हजारो-लाखोंची कमाई, जाणून घ्या प्रोसेस...

Flipkart Sale: मागील काही वर्षात ऑनलाइन बिझनेस कमाई करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 08:07 PM2023-10-03T20:07:10+5:302023-10-03T20:07:34+5:30

Flipkart Sale: मागील काही वर्षात ऑनलाइन बिझनेस कमाई करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे.

Sell on Flipkart: Start Business with Flipkart; Earn thousands or lakhs per month, know the process | Flipkart सोबत सुरू करा व्यवसाय; महिन्याला हजारो-लाखोंची कमाई, जाणून घ्या प्रोसेस...

Flipkart सोबत सुरू करा व्यवसाय; महिन्याला हजारो-लाखोंची कमाई, जाणून घ्या प्रोसेस...

Flipkart Business: येत्या 8 ऑक्टोबरपासून Flipkart बिग बिलियन डेज सेल सुरू होत आहे. मोठ्या सवलती आणि ऑफरचा लाभ घेण्यासाठी अनेकजण फ्लिपकार्ट सेलमधून खरेदी करतील. ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. तुम्हीही फ्लिपकार्टवर ऑनलाइन वस्तू विकून बंपर कमाई करू शकता. फ्लिपकार्ट यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे.

फ्लिपकार्टवर तुम्हाला करोडो लोकांचा ग्राहकवर्ग मिळतो. यामुळे तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढते आणि तुम्ही चांगली कमाईदेखील करू शकता. नवीन विक्रेत्यांसाठी फ्लिपकार्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे. Flipkart वर वस्तू विकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक अकाउंट तयार करावे लागेल. यानंतर तुम्हाला जी उत्पादने विकायची आहेत, ती सर्व यात लिस्ट करावी  लागतील. 

Flipkart Seller: रजिस्ट्रेशन
Flipkart वर उत्पादने विकण्यासाठी Flipkart Seller रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तुम्हाला seller फ्लिपकार्ट पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. यात तुम्हाला तुमच्याव्यवसाय आणि उत्पादनांशी संबंधित सर्व माहिती आणि कागदपत्रांचा तपशील द्यावा लागेल. फ्लिपकार्ट seller रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • जीएसटी नोंदणी
  • ओळख पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • वैध ईमेल आयडी
  • वैध संपर्क क्रमांक
  • बँक स्टेटमेंट किंवा कॅन्सल चेक इ.

प्रोडक्ट लिस्टिंग
या पर्यायावर तुम्हाला फ्लिपकार्टवर तुमच्या वस्तूंची यादी करावी लागेल. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे, तुम्हाला फक्त उत्पादनांचा तपशील आणि किंमत टाकावी लागेल. किमान 1 उत्पादन लिस्ट करणे आवश्यक आहे. 

लॉजिस्टिक्स आणि शिपिंग
ऑर्डर मिळाल्यानंतर उत्पादने ग्राहकांना पाठवावी लागतात. फ्लिपकार्ट तुम्हाला लॉजिस्टिक आणि शिपिंगची सुविधा देते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लिपकार्टची सेवा निवडू शकता. कंपनीकडे शेकडो पिक-अप स्टोअर्स आणि हजारो वितरण कर्मचारी आहेत.

कमिशन आणि पेमेंट

  • फ्लिपकार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी काही शुल्क देखील आकारते. कंपनी चार प्रकारे कमिशन आकारते.
  • कमिशन फी- ऑर्डर केलेल्या वस्तूच्या मूल्याच्या काही टक्के शुल्क आकारले जाते.
  • शिपिंग फी- वस्तूचे वजन आणि वितरण स्थानानुसार आकारले जाते.
  • कलेक्शन फी - पेमेंट गेटवे किंवा रोख कलेक्शन फी.
  • फिक्स्ड फी – सर्व व्यवहारांवर नाममात्र शुल्क.

Flipkart ऑर्डरचे पेमेंट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करते. सर्व शुल्क वजा केल्यावर तुम्हाला हे पैसे मिळतात. 

Web Title: Sell on Flipkart: Start Business with Flipkart; Earn thousands or lakhs per month, know the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.