मुंबई : राजकीय तणावामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण आणि गुंतवणूकदारांनी बँकिंग आणि धातू क्षेत्रत नफेखोरी केल्याने भारतीय बाजारातील तेजीला लगाम बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) तीन दिवसांत पहिल्यांदा 243 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 74 अंकांनी घसरला.
दिवसअखेर मुंबई बाजाराचा निर्देशांक 242.74 अंकांनी घसरत सरतेशेवटी 25,665.27 वर स्थिरावला. निफ्टीही 74.5क् अंकांनी लोटांगण घेत 7,672.क्5 वर
आला.
जागतिक स्तरावरही प्रमुख आशियाई बाजारात घसरण झाली. जपान आणि जकार्ताला सर्वाधिक फटका बसला. युरोपीय बाजारात मंदी दिसून आली.
युक्रेनच्या सीमेवर रशियाच्या फौजांनी जमवाजमाव केल्याने जागतिक वित्तीय बाजार धास्तावला. या शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाही पाच महिन्यांतील नीचांक पातळीवर घसल्याचा भारतीय बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. तसेच रिझव्र्ह बँकेने पतधोरणात व्याजदरात घट न केल्याने बाजाराचे अवसान गळाले. (प्रतिनिधी)
4विक्रीच्या मा:यामुळे आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, सन फार्मा, सेसा, स्टरलाईट, टाटा स्टील, भारतीय एअरटेल, सिप्ला, डॉ. रेड्डीज, एसबीआय आणि एसबीआयसह बीएसई-निर्देशांतील 23 शेअर्सचे भाव घसरले. तथापि, रुपया घसरल्याने आयटी कंपन्यांचे शेअर्स फायद्यात राहिले. इन्फोसिसचे शेअर्स 2.क्1 टक्क्यांनी वधारले.