Lokmat Money > बिझनेस न्यूज > बेरोजगारीपेक्षा अर्धबेरोजगारी अधिक गंभीर

बेरोजगारीपेक्षा अर्धबेरोजगारी अधिक गंभीर

देशात बेरोजगारीच्या तुलनेत अर्धबेरोजगारीची समस्या अधिक आहे. जे काम एक व्यक्ती करू शकते, ते काम दोन किंवा त्यापेक्षा

By admin | Published: May 30, 2017 12:44 AM2017-05-30T00:44:26+5:302017-05-30T00:44:26+5:30

देशात बेरोजगारीच्या तुलनेत अर्धबेरोजगारीची समस्या अधिक आहे. जे काम एक व्यक्ती करू शकते, ते काम दोन किंवा त्यापेक्षा

Semi-job creation more serious than unemployment | बेरोजगारीपेक्षा अर्धबेरोजगारी अधिक गंभीर

बेरोजगारीपेक्षा अर्धबेरोजगारी अधिक गंभीर

 नवी दिल्ली : देशात बेरोजगारीच्या तुलनेत अर्धबेरोजगारीची समस्या अधिक आहे. जे काम एक व्यक्ती करू शकते, ते काम दोन किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी करत आहेत, असे मत निति आयोगाने व्यक्त केले आहे.
मोदी सरकारच्या काळात रोजगाराच्या संधी कमी झाल्याची टीका काँग्रेसकडून होत असताना ही माहिती समोर आली आहे. निति आयोगाने २०१७-१८ ते २०१९-२०च्या कार्यपद्धतीच्या अहवालात उच्च उत्पादकता आणि रोजगारनिर्मितीवर भर दिला आहे. यात म्हटले आहे की, अर्धबेरोजगारीची समस्या अधिक गंभीर आहे.
नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅफिसच्या ) सर्व्हेक्षणानुसार, २०११ - १२मध्ये ४९ टक्के लोक कृषी क्षेत्रात कार्यरत होते. पण, जीडीपीमध्ये त्यांचे योगदान फक्त १७ टक्के होते. देशात उत्पादन क्षेत्रात २०१०-११मध्ये २०पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या संस्थेत ७२ टक्के कर्मचारी कार्यरत होते. पण, एकूण उत्पादनात त्यांचे योगदान केवळ १२ टक्के
होते.
एनएसएसओच्या २००६-०७च्या सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या सर्व्हेनुसार, सेवा उत्पादनात ३८ टक्के भागीदारी असणाऱ्या ६५० मोठ्या कंपन्यात सेवा क्षेत्रातील एकूण कर्मचाऱ्यांच्या केवळ २ टक्के कार्यरत आहेत.
सेवा क्षेत्रातील उर्वरित कंपन्या ९८ टक्के कर्मचाऱ्यांना रोजगार देत आहेत. पण, सेवा उत्पादनात त्यांचे योगदान केवळ ६२ टक्के आहे.

Web Title: Semi-job creation more serious than unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.