टाटा समुह आसाममध्ये सेमीकंडक्टरचा प्रकल्प सुरू करणार आहे, यासाठी २७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. सुविधेबाबत चर्चा करण्यासाठी रतन टाटा यांची आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी भेट घेतली. याबाबतचे फोटो रतन टाटा यांच्या सोशल मीडिया प्लॅफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत. “आसाममध्ये करण्यात येत असलेल्या गुंतवणुकीमुळे कॅन्सरच्या उपचारासाठी राज्याचा कायापालट झाला आहे. आज, आसाम राज्य सरकार टाटा समूहासोबत भागीदारी करून आसामला अत्याधुनिक सेमीकंडक्टर्समध्ये एक प्रमुख निर्माता बनवेल. या नव्या विकासामुळे आसाम जागतिक नकाशावर येईल, असं यावेळी उद्योगपती रतन टाटा म्हणाले. यावेळी उद्योगपती रतन टाटा यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या यांचे आभार मानले.
टाटा समूहाने सेमीकंडक्टर प्लांटसाठी 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. "आसाममध्ये करण्यात येत असलेल्या गुंतवणुकीमुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये राज्याचा कायापालट झाला आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
गुड न्यूज! भारतात कच्च्या तेलाचे साठे वाढले; परदेशात जाणारे पैसे वाचले!
याआधी मंगळवारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आश्वासन दिले की, पहिली सेमी-कंडक्टर चिप आणली जाईल "आमच्याकडे डिसेंबर 2024 पर्यंत पहिली मेड इन इंडिया चिप असेल. योग्य विश्वास असेल तर ते होऊ शकत नाही. पीएम मोदींना खात्री आहे की विकसित भारतसाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची आवश्यकता आहे. टीव्हीपासून पॉवर इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, प्रत्येक गोष्टीत आपल्याला सेमीकंडक्टरची आवश्यकता आहे,असंही अश्विन वैष्णव म्हणाले.
13 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक परिणामांसह तीन सेमीकंडक्टर सुविधांसाठी पायाभरणी केली - गुजरातमध्ये 2 आणि आसाममध्ये 1. टाटा समूह या तीनपैकी दोन प्रकल्प उभारत आहे. भारतातील सेमीकंडक्टर उद्योग अजूनही नवीन आहे, विविध स्थानिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्या त्याच्या अफाट क्षमतेचा वापर करू इच्छित आहेत.
टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड मोरीगाव, आसाम येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करणार आहे. दररोज 48 मिलियन चिप्सची निर्मिती करण्याची क्षमता असलेली ही सुविधा 27,000 कोटी रुपये खर्चून तयार केली जात आहे. ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक वाहने, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम आणि मोबाईल फोन हे विभाग समाविष्ट केले जातील.
मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, भारतातील उद्योगांनी पूर्वीच्या औद्योगिक क्रांतीदरम्यान ईशान्य प्रदेशाचा व्यवसायासाठी कधीही विचार केला नव्हता. भूतकाळात दुर्लक्षित असलेला प्रदेश पंतप्रधान मोदींनी तंत्रज्ञान क्रांतीत समाविष्ट केला होता, असंही सरमा म्हणाले. टाटा समुहाला आशा आहे की गुजरात आणि आसाममधील - ज्यांची पायाभरणी बुधवारी झाली, त्या दोन प्लांटमध्ये सेमीकंडक्टर चिप्सचे व्यावसायिक उत्पादन 2026 मध्ये सुरू होईल. कोविड दरम्यान चिपच्या कमतरतेमुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी, कमतरता भरून काढण्यासाठी स्वदेशी उत्पादनाचे महत्त्व लक्षात आले. दरम्यान, अमेरिकन चिप निर्माता कंपनी मायक्रॉनचा गुजरातमधील साणंद येथील हाय-एंड सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट, जो भारतातील पहिला आहे, वेगाने प्रत्यक्षात येत आहे.
The investments being made in Assam transform the state in complex treatment for cancer care. Today, the state government of Assam in partnership with the Tata group will make Assam a major player in sophisticate semiconductors. This new development will put Assam on the global… pic.twitter.com/mGhgvgVIws
— Ratan N. Tata (@RNTata2000) March 20, 2024