Lokmat Money > बिझनेस न्यूज > Nitin Gadkari : चुकीच्या ठिकाणी कार पार्क केली असेल, आणि...; नितीन गडकरींनी केली बक्षिसाची घोषणा

Nitin Gadkari : चुकीच्या ठिकाणी कार पार्क केली असेल, आणि...; नितीन गडकरींनी केली बक्षिसाची घोषणा

Nitin Gadkari on Wrongly Parked Vehicle: नितीन गडकरी यांच्या या घोषणेनंतर, हा पैसे कमावण्याचा जबरदस्त मार्ग असल्याचे लोकांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 07:01 PM2022-06-16T19:01:56+5:302022-06-17T18:58:20+5:30

Nitin Gadkari on Wrongly Parked Vehicle: नितीन गडकरी यांच्या या घोषणेनंतर, हा पैसे कमावण्याचा जबरदस्त मार्ग असल्याचे लोकांनी म्हटले आहे.

Sending photos of illegally parked cars and get 500 law soon says Road Transport and Highways Minister Nitin gadkari | Nitin Gadkari : चुकीच्या ठिकाणी कार पार्क केली असेल, आणि...; नितीन गडकरींनी केली बक्षिसाची घोषणा

Nitin Gadkari : चुकीच्या ठिकाणी कार पार्क केली असेल, आणि...; नितीन गडकरींनी केली बक्षिसाची घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यशैलीचे सर्वच जण कौतुक करत असतात. गडकरी यांच्या मंत्रालयाने देशभरात तयार केलेले प्रशस्त रस्ते, द्रुतगती मार्ग आणि उड्डाणपुलांच्या जाळ्यामुळे वाहतूक अत्यंत सुखकर झाली आहे. यातच आता, जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवला, तर त्या व्यक्तीला 500 रुपये बक्षीस दिले जाईल, सरकार लवकरच अशा प्रकारचा एक कायदा आणत आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. 

नितीन गडकरी यांच्या या घोषणेनंतर, हा पैसे कमावण्याचा जबरदस्त मार्ग असल्याचे लोकांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, हा कायदा लागू झाल्यानंतर, चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहन मालकांना 1,000 रुपये एवढा दंड भरावा लागेल.

वाहन पार्क करण्यासंदर्भात कायदा करण्याचा विचार - 
केंद्र सरकारने हा कायदा लागू केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघात कमी होणे अपेक्षित आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी या कायद्या संदर्भात माहिती दिली. गडकरी म्हणाले, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन उभे करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपण एक कायदा आणण्याचा विचार करत आहोत. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

लोक पार्किंगची जागा बनवत नसल्याने गडकरी यांनी व्यक्त केली नाराजी -
गडकरी म्हणाले, "मी एक कायदा आणत आहे. यानुसार, जे लोक रस्त्यावर वाहन उभे करतील त्यांना 1,000 रुपये एवढा दंड आकारला जाईल. तसेच, चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवणाऱ्यास 500 रुपये दिले जातील. यावेळी, लोक वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवत नसल्याबद्दलही गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Sending photos of illegally parked cars and get 500 law soon says Road Transport and Highways Minister Nitin gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.