- प्रसाद गो. जोशी
बाजाराला अपेक्षित असलेले करेक्शन अद्याप आले नसले, तरी नफा कमविण्यासाठी होत असलेल्या विक्रीमुळे निर्देशांकांच्या वाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. रिझर्व्ह बॅँकेने रेपो दरात केलेली कपात, आंतरराष्टÑीय बाजारांमधील अनुकूल वातावरण आणि काही आस्थापनांचे जाहीर झालेले चांगले निकाल, यामुळे संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली, तरी बाजार नरमच राहिला.
बाजारात गतसप्ताहाचा आरंभ मागील सप्ताहाप्रमाणेच वाढीव पातळीवर झाला. पहिले दोन दिवस तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे ३२६८६.४८ आणि १०१३७.८५ अशी नव्या उच्चांकाची नोंद केली. त्यानंतर, बाजारावर विक्रीचे दडपण येऊन दोन दिवस बाजार खाली येताना दिसून आला. सप्ताहाच्या अखेरीस मात्र बाजारात पुन्हा खरेदीचा जोर वाढल्याने, सलग पाचव्या सप्ताहात निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले. सप्ताहाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक केवळ १५.५३ अंशांनी वाढून ३२३२५.४१ अंशांवर बंद झाला. त्यामानाने निफ्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली. हा निर्देशांक ९९.२५ अंशांनी वाढून १००६६.४० अंशांवर बंद झाला. रिझर्व्ह बॅँकेने पतधोरण आढाव्यामध्ये रेपो दर कमी केल्याने व्याजदर कमी होणार आहेत. बाजाराला अपेक्षित असलेली ही कपात नसली, तरी सुरुवात तर झाली, अशी भावना दिसून आली आणि खरेदीसाठी गर्दी झाली. काही आस्थापनांचे जाहीर झालेले चांगले निकालही बाजाराला उभारी देऊन गेले. जागतिक शेअर बाजारांमध्येही चांगले वातावरण असल्याचा लाभ भारतीय बाजाराला मिळाला.
गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी विक्रीचा मार्ग पत्करला. या संस्थांनी २४९८.७८ कोटी रुपयांची विक्री केली. मात्र, देशांतर्गत वित्तसंस्था आणि गुंतवणूकदारांनी ३५५३.८९ कोटी रुपये गुंतविले.
निर्गुंतवणुकीसाठी प्रस्ताव मागविले
संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील चार आस्थापनांमधील आपला २५ टक्के वाटा केंद्र सरकार कमी करणार आहे. या आस्थापनांच्या प्रारंभिक भागविक्रीसाठी १८ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील माझगाव डॉक, भारत डायनॅमिक्स, गाडन रिच शीपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स आणि मिश्र धातू निगम या चार आस्थापनांमधील आपले समभाग विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापैकी भारत डायनॅमिक्स ही मिनिरत्न कंपनी आहे. चालू वर्षाच्या एप्रिल महिन्यातच याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. त्यानुसार, निर्गुंतवणूक मंत्रालयाने आता या विक्रीसाठी इच्छुक असणाºयांकडून प्रस्ताव मागविले आहेत. येत्या १८ तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत हे प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये सरकारने सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आस्थापनांमधील ७२,५०० कोटी रुपयांची निर्गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
नफ्यासाठी विक्री तरीही निर्देशांक उच्चांकीच
बाजाराला अपेक्षित असलेले करेक्शन अद्याप आले नसले, तरी नफा कमविण्यासाठी होत असलेल्या विक्रीमुळे निर्देशांकांच्या वाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. रिझर्व्ह बॅँकेने रेपो दरात केलेली कपात, आंतरराष्टÑीय बाजारांमधील अनुकूल वातावरण आणि काही आस्थापनांचे जाहीर झालेले चांगले निकाल, यामुळे संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली, तरी बाजार नरमच राहिला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 01:03 AM2017-08-07T01:03:26+5:302017-08-07T01:03:44+5:30