मुंबई - मंगळवारी शेअर बाजारात नरमाईचा कल दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ०.४९ अंकांच्या नाममात्र घसरणीसह ३३,८१२.२६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.६५ अंकांच्या नाममात्र वाढीसह १०,४४२.२० अंकावर बंद झाला. बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसी या सरकारी तेल कंपन्यांचे समभाग उतरले. भारती एअरटेल, एसबीआय, एलअँडटी, अॅक्सिस बँक, टीसीएस, आयटीसी, अदाणी पोर्ट्स, हिंद युनिलिव्हर, इन्फोसिस, येस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभागही उतरले. ओएनजीसी, एनटीपीसी, इंडसइंड बँक, एचडीएफसी लि., टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग वाढले.
शेअर बाजारात नरमाईचा कल
मंगळवारी शेअर बाजारात नरमाईचा कल दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ०.४९ अंकांच्या नाममात्र घसरणीसह ३३,८१२.२६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.६५ अंकांच्या नाममात्र वाढीसह १०,४४२.२० अंकावर बंद झाला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:00 AM2018-01-03T01:00:35+5:302018-01-03T01:00:48+5:30