Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची आपटी!

सेन्सेक्सची आपटी!

जागतिक बाजारातील नरमाईचा कल आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेला विक्रीचा मारा यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी ६९९ अंकांनी आपटला.

By admin | Published: November 12, 2016 02:02 AM2016-11-12T02:02:47+5:302016-11-12T02:02:47+5:30

जागतिक बाजारातील नरमाईचा कल आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेला विक्रीचा मारा यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी ६९९ अंकांनी आपटला.

Sensex! | सेन्सेक्सची आपटी!

सेन्सेक्सची आपटी!

मुंबई : जागतिक बाजारातील नरमाईचा कल आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेला विक्रीचा मारा यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी ६९९ अंकांनी आपटला. ११ फेब्रुवारीनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवशीय घसरण ठरली. त्याचबरोबर सेन्सेक्स २७ हजार अंकांच्या खाली येऊन चार महिन्यांच्या नीचांकावर गेला.
सूत्रांनी सांगितले की, अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. यांनी बाजारातील गुंतवणूक काढून घेण्यास प्राधान्य दिले आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळीच नरमाईने उघडला होता. नंतर तो आणखी घसरत
गेला. सत्राच्या अखेरीस ६९८.८६ अंकांची अथवा २.५४ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २६,८१८.८२ अंकांवर बंद झाला. ११ फेब्रुवारी
रोजी सेन्सेक्स ८0७.0७ अंकांनी घसरला होता. त्यानंतरची ही
सर्वांत मोठी घसरण ठरली. तसेच
२९ जूननंतरचा हा नीचांकी
बंद ठरला.
तत्पूर्वी काल सेन्सेक्स २६५.१५ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी २२९.४५ अंकांनी अथवा २.६९ टक्क्यांनी घसरून ८,२९६.३0 अंकांवर बंद झाला. ३0 जूननंतरचा हा नीचांकी बंद ठरला. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स ४५५.३३ अंकांनी अथवा १.६६ टक्क्यांनी, तर निफ्टी १३७.४५ अंकांनी अथवा १.६२ टक्क्यांनी घसरला. (लोकमत न्यूज नेटवर्क)


बाजारात चौफेर घसरण
सेन्सेक्समधील ३0पैकी २९ कंपन्यांचे समभाग घसरले. फक्त सन फार्माचा समभाग ३.३0 टक्क्यांनी वाढला. तिमाही निकालात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे सन फार्माचा समभाग वाढला. घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत एम अ‍ॅण्ड एम, अदाणी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, एचडीएफसी, मारुती सुझुकी, गेल, बजाज आॅटो, पॉवर ग्रीड, टीसीएस यांचा समावेश आहे.

एसबीआयला फटका : एसबीआय आणि काही आयटी कंपन्यांची वाईट तिमाही कामगिरी बाजाराच्या मुळावर आली. बुडीत कर्जासाठी अतिरिक्त तरतूद करावी लागल्यामुळे सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत एसबीआयचा शुद्ध नफा ९९.६ टक्क्यांनी घसरून २0.७ कोटींवर आला. एसबीआयचा समभाग ३.0९ टक्क्यांनी आपटला.
आशियात संमिश्र कल राहिला. हाँगकाँगचा हँग सेंग १.३९ टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई 0.१८ टक्क्यांनी, तर शांघाय कंपोजिट 0.७८ टक्क्यांनी वाढला. युरोपात नरमाईचा कल दिसून आला. ब्रिटन आणि फ्रान्समधील बाजार सकाळी खाली चालले होते.

Web Title: Sensex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.