मुंबई : युरोपीय बाजारातील तेजी आणि देशांतर्गत बाजारातील जोरदार खरेदी यामुळे बुधवारी शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७२ अंकांनी वाढून २४,८५४.११ अंकांवर बंद झाला. तिमाही निकालाच्या आधी आरआयएल आणि इन्फोसिस यांच्या समभागांत जोरदार खरेदी झाल्यामुळे बाजाराने उसळी घेतली.
अत्यंत अस्थिर राहिलेल्या सत्रादरम्यान सेन्सेक्स तब्बल ५७0 अंकांनी वाढला होता. तथापि, नंतर त्यात घसरण झाली. युरोपीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण राहिल्यामुळे बाजारातील धारणा मजबूत झाली. विशेष म्हणजे आदल्या दिवशी औद्योगिक उत्पादनातील घट आणि किरकोळ किंमत निर्देशांकावरील महागाईतील वाढ यांचे आकडे जाहीर झाले असतानाही बाजारात तेजी दिसली.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १७२.0८ अंकांनी अथवा 0.७0 टक्क्यांनी वाढून २४,८५४.११ अंकांवर बंद झाला. आदल्या सत्रात सेन्सेक्स २५२.३0 अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५२.१0 अंकांनी अथवा 0.६९ टक्क्यांनी वाढून ७,५६२,४0 अंकांवर बंद झाला. तेजीचा लाभ मिळालेल्या कंपन्यांत ३.0९ टक्के लाभासह आरआयएल सर्वोच्च राहिली. कंपनीचा समभाग १,0७७.३५ रुपयांवर बंद झाला. ३0.८ टक्के लाभासह इन्फोसिस दुसऱ्या स्थानी राहिली. कंपनीचा समभाग १,0८२.३५ रुपयांवर बंद झाला. इन्फोसिसचा तिमाही निकाल उद्या जाहीर होणार आहे. (वृत्तसंस्था)
१७ कंपन्या तेजीत
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी १७ कंपन्यांचे समभाग वाढले. अदाणी पोर्टस्, भारती एअरटेल, लुपीन, टीसीएस आणि एलअँडटी यांचे समभाग मात्र घसरले. व्यापक बाजारात मात्र घसरणीचाच कल दिसून आला. स्मॉलकॅप १.७६ टक्क्यांनी, तर मीडकॅप 0.४६ टक्क्यांनी घसरला. जागतिक पातळीवर हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया येथील बाजार तेजीसह बंद झाले. चीनचा शांघाय कंपोजिट मात्र २.४२ टक्क्यांनी घसरला. चीनची निर्यात अपेक्षेपेक्षा चांगली राहिली असतानाही तेथील बाजार वर चढू शकले नाहीत.
सेन्सेक्स १७२ अंकांनी, निफ्टी ५२ अंकांनी तेजीत
युरोपीय बाजारातील तेजी आणि देशांतर्गत बाजारातील जोरदार खरेदी यामुळे बुधवारी शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७२ अंकांनी
By admin | Published: January 14, 2016 02:12 AM2016-01-14T02:12:43+5:302016-01-14T02:12:43+5:30