Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स दोन आठवड्यांनी २७ हजारांपार

सेन्सेक्स दोन आठवड्यांनी २७ हजारांपार

ब्रिटन युरोपीय महासंघात कायम राहण्याचे संकेत मिळाल्याने उत्साहित गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीने गुरुवारी सेन्सेक्स २३६.५६ अंकांनी वधारून दोन आठवड्यांनंतर २७ हजारांच्या

By admin | Published: June 24, 2016 04:11 AM2016-06-24T04:11:59+5:302016-06-24T04:11:59+5:30

ब्रिटन युरोपीय महासंघात कायम राहण्याचे संकेत मिळाल्याने उत्साहित गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीने गुरुवारी सेन्सेक्स २३६.५६ अंकांनी वधारून दोन आठवड्यांनंतर २७ हजारांच्या

Sensex 27 weeks in two weeks | सेन्सेक्स दोन आठवड्यांनी २७ हजारांपार

सेन्सेक्स दोन आठवड्यांनी २७ हजारांपार

मुंबई : ब्रिटन युरोपीय महासंघात कायम राहण्याचे संकेत मिळाल्याने उत्साहित गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीने गुरुवारी सेन्सेक्स २३६.५६ अंकांनी वधारून दोन आठवड्यांनंतर २७ हजारांच्या वर गेला व २७,००२.२२ अंकांवर बाजार बंद झाला. नॅशनल एक्स्चेंजचा ‘निफ्टी’सुद्धा ६६.७५ अंकांनी वधारून ८,२७०.४५ अंकांवर गेला. ब्रिटन युरोपीय महासंघात राहणार की नाही याबाबत गुरुवारी तेथे सार्वमत घेण्यात आले. तत्पूर्वी, करण्यात आलेल्या दोन जनमत चाचण्यांत लोकांनी युरोपीय महासंघात राहण्याचे संकेत दिले. त्यामुळे बाजारात उत्साह होता.
ब्रिटन युरोपीय महासंघात कायम राहण्याच्या शक्यतेने युरोप आर्थिक मंदीच्या जाळ्यात फसण्याची शक्यताही निकाली निघणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. मात्र, प्रारंभीच सकाळी सेन्सेक्स १२.४५ अंकांनी घसरून २६७५३.२० अंकांवर बाजार सुरू झाला. त्यानंतर तो काही वेळातच २६,७३६.५२ या नीचांकी स्तरावर गेला. त्यानंतर गुंतवणूकदारांनी खरेदीचे सत्र सुरू केल्याने तेजी आली. त्यात तो काही काळ २७,००६०.९८
या सर्वोच्च स्तरावर पोहोचला. शेवटी तो २३६.५७ अंकांनी
उसळून २७,०२२.२२ अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Sensex 27 weeks in two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.