मुंबई : शेअर बाजारांत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. खरेदीचा जोर वाढल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३११.२२ अंकांनी वाढून २५,७४६.७८ अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारातील तेजी आणि अमेरिकी शेअर बाजारातील उसळीने भारतीय शेअर बाजारांत जान आणली आहे. चीनमधील बाजार आठवड्याच्या समाप्तीच्या मोठ्या सुटीनिमित्त बंद होते. त्याचा लाभही बाजारांना झाला.
गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्स ९३0 अंकांनी उसळला होता. चीनमधील मंदी आणि जागतिक पातळीवर घसरत चाललेली आर्थिक वाढ याच्या परिणामातून ही घसरण झाली होती. काल सेन्सेक्स २५,४५३.५६ अंकांवर आला होता. ८ आॅगस्ट २0१४ रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता.
बीएसई सेन्सेक्स सकाळी २५,६१४.६९ अंकांवर तेजीसह उघडला. त्यानंतर तो आणखी वाढून २५८३५.४१ अंकांपर्यंत वर चढला. ही दिवसातील सर्वोच्च पातळी ठरली. त्यानंतर मात्र तो थोडा घसरला. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स २५,७६४.७८ अंकांवर बंद झाला. ३११.२२ अंकांची अथवा १.२२ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.
व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पुन्हा एकदा ७,८00 अंकांच्या पातळीच्या पुढे गेला आहे. १0६.00 अंकांची अथवा १.३७ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स ७,८२३ अंकांवर बंद झाला.
आशियाई बाजारांत वाढीचा कल दिसून आला. जपानचा निक्केई 0.४८ टक्क्यांनी वर चढला. चीन आणि हाँगकाँग येथील बाजार सुटीमुळे बंद होते. युरोपीय बाजारांत सकाळी वाढीचा कल दिसून आला. (वृत्तसंस्था)
खरेदी वाढल्याने सेन्सेक्स ३११ अंकांनी तेजीत
शेअर बाजारांत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. खरेदीचा जोर वाढल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३११.२२ अंकांनी वाढून २५,७४६.७८ अंकांवर बंद झाला.
By admin | Published: September 3, 2015 10:03 PM2015-09-03T22:03:44+5:302015-09-03T22:03:44+5:30