Join us

सेन्सेक्स ३२३ अंकांनी उसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 3:34 AM

जागतिक पातळीवरील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२२.६५ अंकांनी वाढून ३४,१४२.१५ अंकांवर बंद झाला.

मुंबई : जागतिक पातळीवरील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२२.६५ अंकांनी वाढून ३४,१४२.१५ अंकांवर बंद झाला. १५ फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. आदल्या सत्रात सेन्सेक्स २५.३६ अंकांनी घसरला होता. राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी १०८.३५ अंकांनी वाढून १०,४९१.०५ अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स १३१.३९ अंकांनी, तर निफ्टी ३८.७५ अंकांनी वाढला.तेजीचा लाभ झालेल्या कंपन्यांत टाटा स्टील, सन फार्मा, येस बँक, भारती एअरटेल, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज्, एनटीपीसी, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस, पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, आरआयएल, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एल अँड टी, बजाज आॅटो, आयटीसी, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, अदाणी पोर्टस् आणि एचडीएफसी लि. यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँक आणि गीतांजली जेम्स यांचे समभाग घसरले.

टॅग्स :निर्देशांक