मुंबई - शुक्रवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आर्थिक जगतात निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अर्थविश्वातील या निराशेचे पडसाद सोमवारी शेअर बाजारात उमटले असून, दिवसभराच्या व्यवहारांनंतर सेंसेक्समध्ये मोठी घसरण दिसून आली. संपूर्ण दिवसभरात सेंसेक्स 792.82 अंकांनी कोसळून 38 हजार 720.57 अंकांवर बंद झाला. सेंसेक्सबरोबरच नॅशनल स्टॉक्स एक्सेंजच्या निफ्टीमध्येही 252.55 अंकांची घसरण झाली असून, निफ्टी 11 हजार 558.60 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील या पडझडीमुळे गुंतवणुकदारांचे सुमारे 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेअर बाजार 792 अंकांनी कोसळला, गुंतवणुकदारांचे पाच लाख कोटी बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 4:46 PM