Join us

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४१ अंकांनी वाढला

By admin | Published: February 17, 2015 12:30 AM

अत्यंत अस्थिर सत्रादरम्यान सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0.९५ अंकांनी वर चढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३.८५ अंकांनी वाढला.

मुंबई : अत्यंत अस्थिर सत्रादरम्यान सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0.९५ अंकांनी वर चढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३.८५ अंकांनी वाढला. बँकिंग, औषधी, तेल आणि गॅस या क्षेत्रात विक्रीचा मारा दिसून आला.बाजारांतील वाढ छोटी असली तरी सलग पाचव्या सत्रांत बाजार वर चढला आहे. त्याचप्रमाणे सेन्सेक्स २ आठवड्यांच्या उच्चांकावर गेला आहे. या बाबी बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांना उत्तम लाभ झाला. या क्षेत्रांचे निर्देशांक ३ टक्क्यांनी वाढले. एचडीएफसी, टीसीएस आणि टाटा मोटर्स या कंपन्यांच्या समभागांनी बाजारांना तारले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह २९,१७0.७७ अंकांवर उघडला. त्यानंतर तो २९,३२५.३५ अंकांपर्यंत वर चढला. कालच्या तुलनेत २३0 अंकांची वाढ सेन्सेक्सने मिळविली होती. तथापि, नंतर तो घसरणीला लागला. सत्रअखेरीस २९,१३५.८८ अंकांवर बंद झाला. ४0.९५ अंक अथवा 0.१४ टक्क्यांची वाढ सेन्सेक्सने मिळविली. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्सने ९0८.४९ अंकांची वाढ मिळविली आहे. ही वाढ ३.२२ टक्के आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ३.८५ अंकांनी वाढून ८,८0९.३५ अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलावर ५ टक्के सीमा शुल्क पुन्हा लावण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण जेटली घेत असल्याचे वृत्त आल्यामुळे तेल आणि गॅस कंपन्यांचे समभाग कोसळले. तत्पूर्वी काल विदेशी गुंतवणूकदारांनी ३९0.२६ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. आशियातील अनेक बाजारांना आज सुटी होती. चीन, हाँगकाँग, जपान आणि सिंगापूर येथील बाजार 0.0३ टक्के ते 0.५८ टक्के वाढले. युरोपीय बाजारात नकारात्मक वातावरण दिसून आले. ग्रीसच्या कर्जावर काय निर्णय होतो, याची चिंता या बाजारांना लागली आहे. ब्रिटन आणि जर्मनी येथील बाजार 0.१0 टक्के ते 0.१६ टक्के वाढले. फ्रान्सचा कॅक मात्र 0.0८ टक्क्यांनी वर चढला. बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,५९५ कंपन्यांचे समभाग लाल टापूत राहिले. (वृत्तसंस्था)१,३१५ कंपन्यांचे समभाग हिरव्या टापूत राहिले. बाजाराची एकूण उलाढाल घसरून ३,५५0.४३ कोटी झाली. आदल्या सत्रात ती ४,0३८.१८ कोटी रुपये होती. ४सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १६ कंपन्यांचे समभाग वाढले. १४ कंपन्यांचे समभाग घसरले. ४तेजीत असलेल्या कंपन्यांत आयटीसी, टीसीएस, एचयूएल, एचडीएफसी, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, एमअँडएम, टाटा स्टील यांचा समावेश आहे.