Lokmat Money > बिझनेस न्यूज > ४६0 अंकांनी उसळला सेन्सेक्स

४६0 अंकांनी उसळला सेन्सेक्स

शेअर बाजारात सोमवारी तेजीचे दर्शन झाले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६0 अंकांनी उसळला, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,८00 अंकांची पातळी ओलांडून पुढे गेला.

By admin | Published: May 10, 2016 03:33 AM2016-05-10T03:33:21+5:302016-05-10T03:33:21+5:30

शेअर बाजारात सोमवारी तेजीचे दर्शन झाले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६0 अंकांनी उसळला, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,८00 अंकांची पातळी ओलांडून पुढे गेला.

Sensex by 460 points | ४६0 अंकांनी उसळला सेन्सेक्स

४६0 अंकांनी उसळला सेन्सेक्स

मुंबई : शेअर बाजारात सोमवारी तेजीचे दर्शन झाले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६0 अंकांनी उसळला, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,८00 अंकांची पातळी ओलांडून पुढे गेला.
जागतिक बाजारातील तेजी, विदेशी संस्थांनी केलेली जोरदार खरेदी आणि गुंतवणूक वाढण्यास पूरक वातावरण यामुळे बाजार उसळल्याचे ब्रोकरांनी सांगितले. अमेरिकेतील व्याजदरातील वाढ छोटी आणि मंदगतीची असेल, असे संकेत अमेरिकेच्या रोजगारविषयक अहवालाने दिले आहेत. त्याचा लाभही बाजारांना मिळाला.
सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढला. सत्राच्या अखेरीस तो दोन आठवड्यांच्या उच्चांकावर (२५,६८८.८६) बंद झाला. ४६0.३६ अंकांची अथवा १.८२ टक्क्यांची वाढ त्याने मिळविली. १३ एप्रिलनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवशीय वाढ ठरली. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी १३२.६0 अंकांनी अथवा १.७१ टक्क्यांनी वाढून ७,८६६.0५ अंकावर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. बजाज आॅटोचा समभाग सर्वाधिक ३.७८ टक्क्यांनी वाढून २,५२७.९५ रुपयांवर गेला. अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग ३.४१ टक्क्यांनी वाढला. आयसीआयसीआय बँक, एलअ‍ॅण्डटी, भारती एअरटेल, एनटीपीसी, हीरो मोटोकॉर्प, एशियन पेंटस्, एचडीएफसी बँक, टीसीएस, एमअ‍ॅण्डएम, ओएनजीसी आणि इन्फोसिस यांचे समभागही वाढले.

Web Title: Sensex by 460 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.