मुंबई : शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढ मिळविल्यानंतर मुंबई शेअर बाजार पुन्हा ३६ हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. २६९.४४ अंकांनी वाढलेला सेन्सेक्स ३६,0७६.७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८0.१0 अंकांनी वाढून १0,८५९.९0 अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स ३३४.६५ अंकांनी, निफ्टी १0५.९ अंक वाढला.
सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी सन फार्मा, बजाज फायनान्स, वेदांता, येस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग २.९८ टक्क्यांपर्यंत वाढले. याउलट टीसीएस, बजाज आॅटो, हीरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, पॉवर ग्रीड आणि इन्फोसिस यांचे समभाग 0.७0 टक्क्यांपर्यंत घसरले. बँकिंग समभागांनी सर्वाधिक वाढ मिळविली. या महिन्याच्या अखेरपर्यंत भारत सरकार सात सरकारी बँकांना २८,६१५ कोटी रुपयांचे भांडवल देणार असल्याच्या वृत्ताचा लाभ बँकिंग समभागांना झाला.
येस बँक, आयसीआयसीआय, बँक आॅफ बडोदा, एसबीआय, कोटक बँक यांचे समभाग वाढले. टिकाऊ ग्राहक वस्तू व आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही वाढल्याचे दिसून आले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी १,७३१.९१ कोटी रुपयांची शुद्ध गुंतवणूक केली. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६६३.00 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
बँकांच्या शेअर्समुळे सेन्सेक्स पुन्हा ३६ हजारी
शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढ मिळविल्यानंतर मुंबई शेअर बाजार पुन्हा ३६ हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. २६९.४४ अंकांनी वाढलेला सेन्सेक्स ३६,0७६.७२ अंकांवर बंद झाला.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:50 AM2018-12-29T05:50:26+5:302018-12-29T05:50:47+5:30