Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनमधील मंदीमुळे सेन्सेक्स पुन्हा घसरला

चीनमधील मंदीमुळे सेन्सेक्स पुन्हा घसरला

चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात सापडल्यामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीमुळे भारतीय शेअर बाजारांत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार १९ महिन्यांच्या

By admin | Published: January 12, 2016 03:50 AM2016-01-12T03:50:09+5:302016-01-12T03:50:09+5:30

चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात सापडल्यामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीमुळे भारतीय शेअर बाजारांत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार १९ महिन्यांच्या

Sensex again dropped again due to China's recession | चीनमधील मंदीमुळे सेन्सेक्स पुन्हा घसरला

चीनमधील मंदीमुळे सेन्सेक्स पुन्हा घसरला

मुंबई : चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात सापडल्यामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीमुळे भारतीय शेअर बाजारांत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार १९ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही मोठ्या प्रमाणात घसरला आहे.
टीसीएसच्या तिमाही कामगिरीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवरही बाजारात सतर्कतेचे वातावरण पाहायला मिळाले. गेल्या सहा सत्रांत बाजार चौथ्यांदा घसरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0९.२९ अंकांनी अथवा 0.४४ टक्क्यांनी घसरून २४,८२५.0४ अंकांवर बंद झाला. त्याआधी शुक्रवारी सेन्सेक्स ८२.५0 अंकांनी वाढला होता.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५६३.८५ अंकांवर बंद झाला. ३७.५0 अंकांची अथवा 0.४९ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली.
एमअँडएमचा समभाग सर्वाधिक ३.४0 टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल विप्रो, अदाणी पोर्टस्, भेल, डॉ. रेड्डीज, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, सिप्ला आणि टीसीएस यांचे समभाग घसरले. कोल इंडिया, सन फार्मा, ओएनजीसी, एचडीएफसी, गेल, लुपीन, बजाज आॅटो, टाटा स्टील, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि एलअँडटी यांचे समभागही घसरले. आरआयएलचा समभाग मात्र सर्वाधिक २.६९ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल टाटा मोटर्स, मारुती सुझुकी यांचे समभाग घसरले.
क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई हेल्थकेअर निर्देशांक सर्वाधिक १.३७ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल आयटी, टेक, पीएसयू आणि बँकिंग क्षेत्राचे निर्देशांक घसरले. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २२ कंपन्यांचे समभाग घसरले. ८ कंपन्यांचे समभाग वाढले. मीडकॅप 0.९५ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप 0.४७ टक्क्यांनी घसरला. आशियाई बाजारांत नरमाईचा कल दिसून आला. युरोपीय बाजारांत मात्र सकाळी तेजी पाहायला मिळाली.

Web Title: Sensex again dropped again due to China's recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.