Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्ससह सोनेही उच्चांकावर, बाजाराची घोडदौड कायम, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्ससह सोनेही उच्चांकावर, बाजाराची घोडदौड कायम, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये तेजी

Mumbai: नव्या आर्थिक वर्षात बाजाराची घोडदौड कायमच आहे. गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. सेन्सेक्सने ७४,५०१ अंकांचा उच्चांक नोंदवला, तर निफ्टीही २२,६१९ अंकांपर्यंत उसळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 07:44 AM2024-04-05T07:44:34+5:302024-04-05T07:45:22+5:30

Mumbai: नव्या आर्थिक वर्षात बाजाराची घोडदौड कायमच आहे. गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. सेन्सेक्सने ७४,५०१ अंकांचा उच्चांक नोंदवला, तर निफ्टीही २२,६१९ अंकांपर्यंत उसळला.

Sensex and gold also at highs, market bull run continues, banking and metal shares bullish | सेन्सेक्ससह सोनेही उच्चांकावर, बाजाराची घोडदौड कायम, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्ससह सोनेही उच्चांकावर, बाजाराची घोडदौड कायम, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये तेजी

 मु्ंबई - नव्या आर्थिक वर्षात बाजाराची घोडदौड कायमच आहे. गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. सेन्सेक्सने ७४,५०१ अंकांचा उच्चांक नोंदवला, तर निफ्टीही २२,६१९ अंकांपर्यंत उसळला. हा उच्चांक नोंदवल्यानंतर ३५० अंकांच्या वृद्धीसह ७४,२२७ अंकांवर स्थिरावला तर निफ्टीही ८० अंकांच्या वाढीसह २२,५१४ अंकांवर स्थिरावला. 
एचडीएफसी बँकेच्या शेअरने जोरदार वृद्धी नोंदविली. बँकेचे समभाग २.५५% उसळले तर हिंदाल्कोमध्ये १.८९%, एनटीपीसीमध्ये १.७५%, पॉवर ग्रीडमध्ये १.३९%, ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये १.३८% तेजी दिसली, बँकिंग व मेटल शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी २१ मध्ये वृद्धी दिसून आली तर ९ समभाग घसरले.

सोने-चांदीचे दर सार्वकालिक उच्चांकावर
बाजारात तेजीचे वातावरण असतानाच सोन्यानेही गुरुवारी सार्वकालिक उच्चांक नोंदवला. २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रतितोळा गुरुवारी ५७२ रुपयांनी वाढल्याने सोने ६९,९३६ रुपयांवर पोहोचले.
चांदीनेही आजवरचा सार्वकालिक दर गुरुवारी नोंदवला. १,४६९ रुपयांनी वाढून चांदीचे दर प्रतिकिलो ७९,०६३ रुपये इतके झाले. बुधवारी दर प्रतिकिलो ७७,५९४ रुपये इतका होता. 

तेजीची कारणे
- २०२४ मध्ये जगात आर्थिक मंदीची शक्यता
- लग्नसराईमुळे सध्या सोन्याला जोरदार मागणी
- जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी

Web Title: Sensex and gold also at highs, market bull run continues, banking and metal shares bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.