मुंबई : चीनमधील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतीय शेअर बाजारांत मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ५५५ अंकांनी घसरून २५ हजार अंकांच्या खाली आला. त्याबरोबर सेन्सेक्स १९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७२.७0 अंकांनी अथवा २.२३ टक्क्यांनी घसरून ७६00 अंकांच्या खाली आला आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी मंदीनेच उघडला होता. संपूर्ण दिवसभर तो नरमच राहिला. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स ५५४.५0 अंकांनी अथवा २.१८ टक्क्यांनी घसरून २४,८५१.८३ अंकांवर बंद झाला. ४ जून २0१४ नंतरची ही सर्वांत नीचांकी पातळी ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २४,८0५.८३ अंकांवर बंद झाला होता. इंट्रा डे व्यवहारात २४,८२५.७0 अंक हा सेन्सेक्सचा नीचांक राहिला. गेल्या ४ सत्रांपासून सेन्सेक्स घसरत आहे. या चार सत्रांत १,३0९.0७ अंक त्याने गमावले आहेत.
एनएसई निफ्टी ७,६00 अंकांच्या खाली आल्यानंतर ७,५५६.६0 अंकांपर्यंत घसरला होता. सत्राच्या अखेरीस तो ७,५६८.३0 अंकांवर बंद झाला. १७२.७0 अंक अथवा २.२३ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली.
क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक ४.५0 टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल इन्फ्रास्ट्रक्चर, आॅटो, मेटल आणि पॉवर हे निर्देशांक घसरले. ब्ल्यूचिप कंपन्यांनी माना टाकलेल्या असताना व्यापक बाजारात मात्र तेजीचे वातावरण दिसून आले. बीएसई स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप निर्देशांक अनुक्रमे २.८७ टक्के आणि २.६१ टक्के वाढले. तत्पूर्वी, काल विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी २४२.४८ कोटी रुपयांचे समभाग विकले.
२५ हजारांच्या खाली सेन्सेक्स!
चीनमधील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतीय शेअर बाजारांत मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ५५५ अंकांनी घसरून २५ हजार अंकांच्या खाली आला.
By admin | Published: January 8, 2016 03:07 AM2016-01-08T03:07:07+5:302016-01-08T03:07:07+5:30