Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४२ अंकांनी कोसळला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४२ अंकांनी कोसळला

विक्रीचा प्रचंड मारा झाल्यामुळे शुक्रवारी जगभरातील शेअर बाजार आपटले. भारतीय शेअर बाजारांतही मोठी पडझड दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स

By admin | Published: August 21, 2015 10:09 PM2015-08-21T22:09:56+5:302015-08-21T22:09:56+5:30

विक्रीचा प्रचंड मारा झाल्यामुळे शुक्रवारी जगभरातील शेअर बाजार आपटले. भारतीय शेअर बाजारांतही मोठी पडझड दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स

The Sensex of the Bombay Stock Exchange fell by 242 points | मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४२ अंकांनी कोसळला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४२ अंकांनी कोसळला

मुंबई : विक्रीचा प्रचंड मारा झाल्यामुळे शुक्रवारी जगभरातील शेअर बाजार आपटले. भारतीय शेअर बाजारांतही मोठी पडझड दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४२ अंकांनी घसरून २७,३६६.0७ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा दोन महिन्यांचा नीचांक ठरला आहे.
चीनमधील कारखाना उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे जगभरातील बाजारांत निराशा पसरली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तर ४५0 अंकांनी खाली आला होता. नंतर त्यात सुधारणा झाल्याने घसरणीचा आकडा थोडा खाली आला. अमेरिकेतील बाजारांतही मोठी पडझड झाल्याचे दिसून आले. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढता तणाव हेही एक घसरणीमागील कारण असल्याचे सांगण्यात
आले.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,३00 अंकांच्या खाली आला आहे. ७२.८0 अंकांची अथवा 0.८७ टक्क्यांची घसरण होऊन निफ्टी ८,२९९.९५ अंकांवर बंद
झाला.
विदेशी गुंतवणूकदारांनी काल बाजारातून १,00७.२६ कोटींची गुंतवणूक काढून घेतली. घसरणीमागील हेही एक कारण आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २७,४४0.१0 अंकांवर नरमाईने उघडला होता. त्यानंतर तो आणखी घसरला. एका क्षणी तो २७,१३१.४४ अंकांपर्यंत खाली गेला होता. त्यानंतर काही प्रमाणात खरेदी सुरू झाली. गमावलेल्या अंकांपैकी जवळपास अर्धे अंक सेन्सेक्सने परत मिळविले. ए.पी. शाह यांच्या नेतृत्वाखालील मॅटविषयक समितीने १ एप्रिलपूर्वीच्या काळातील गुंतवणुकीवर कर न लावण्याची शिफारस केल्याचे वृत्त आल्याचा लाभ बाजाराला झाला. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स २४१.७५ अंकांनी अथवा 0.८८ टक्क्यांनी घसरून २७,३६६.0७ अंकांवर बंद झाला. १९ जूननंतरची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे.
वेदांताचा समभाग सर्वाधिक ३.८१ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल बजाज आॅटो, हीरो मोटोकॉर्प आणि गेल या कंपन्यांना फटका बसला. रिअल्टी, वाहन, भांडवली वस्तू, बँकिंग, ऊर्जा, तेल आणि गॅस धातू अशा सर्व प्रमुख क्षेत्रात घसरण दिसून आली.
या आठवड्यात सेन्सेक्सने ७0१.२४ अंक, तर निफ्टीने २१८.६0 अंक गमावले आहेत.
(वृत्तसंस्था)

Web Title: The Sensex of the Bombay Stock Exchange fell by 242 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.