Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऐतिहासिक! सेन्सेक्स बनला ४७ हजारी; निफ्टीचीही घोडदौड सुरू

ऐतिहासिक! सेन्सेक्स बनला ४७ हजारी; निफ्टीचीही घोडदौड सुरू

परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळेच सलग सहाव्या सत्रामध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन विक्रमांची नोंद केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 02:08 AM2020-12-19T02:08:07+5:302020-12-19T06:54:13+5:30

परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळेच सलग सहाव्या सत्रामध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन विक्रमांची नोंद केली आहे.

Sensex briefly crosses 47000 mark for 1st time | ऐतिहासिक! सेन्सेक्स बनला ४७ हजारी; निफ्टीचीही घोडदौड सुरू

ऐतिहासिक! सेन्सेक्स बनला ४७ हजारी; निफ्टीचीही घोडदौड सुरू

मुंबई : सातत्याने वाढत असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारीही नवीन उच्चांकाची नोंद केली. या सत्रामध्येच सेन्सेक्सने ४७ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. मात्र बाजार बंद होताना हा निर्देशांक काहीसा कमी झाला.

परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळेच सलग सहाव्या सत्रामध्ये शेअर बाजाराच्यानिर्देशांकांनी नवीन विक्रमांची नोंद केली आहे. दिवसभरामध्ये सेन्सेक्सने ४७,०२६.०२ अंशांचा नवीन उच्चांक गाठला. मात्र दिवसअखेर तो  ४६,९६०.६९ अंशांवर बंद झाला. 

गुरुवारपेक्षा त्यात ७०.३५ अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १९.८५ अंशांनी वाढून १३,७६०.९५ असा उच्चांकी बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र घट झाली आहे.

Web Title: Sensex briefly crosses 47000 mark for 1st time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.