मुंबई : शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सहा आठवड्यांत पहिल्यांदाच घसरणीसह बंद झाला आहे. या आठवड्यात सेन्सेक्स ६0.५२ अंकांनी अथवा 0.२0 टक्क्यांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४१.९५ अंकांनी अथवा 0.४६ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, शुक्रवारच्या सत्रात ७.३४ अंकांनी अथवा 0.0३ टक्क्यांनी घसरून २८,८३२.४५ अंकांवर बंद झाला. निफ्टीही २.२0 अंकांनी अथवा 0.0२ टक्क्यांनी घसरून ८,८९७.५५ अंकांवर बंद झाला. एचडीएफसी बँकेचा समभाग सर्वाधिक १.८९ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल एशियन पेंट्स, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, मारुती सुझुकी, एमअँडएम, भारती एअरटेल आणि टीसीएस यांचे समभाग घसरले. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0पैकी १६ कंपन्यांचे समभाग घसरले. १४ कंपन्यांचे समभाग वाढले. वाढलेल्या समभागांत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि गेलचा समावेश आहे.
सहा आठवड्यांनंतर सेन्सेक्स घसरणीसह बंद
By admin | Published: March 04, 2017 4:24 AM