मुंबई: शेअर बाजारात आणखी एक घोटाळा होत असल्याचं सूचक ट्विट हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांनी शनिवारी केलं. त्याचा परिणाम आता बाजारात दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजार कोसळला आहे. अनेक शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आहे. सुचेता दलाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एक समूह असा उल्लेख केला होता. मात्र त्यांनी ट्विटमध्ये समूहाचं नाव स्पष्ट केलं नव्हतं.अदानींसाठी काळा दिवस! 6 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, लोअर सर्किटची वेळ
'सेबीकडे असलेल्या ट्रॅकिंग यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या बाहेर असलेला आणि उघडकीस येण्यास अवघड असलेला आणखी एक घोटाळा. एका समूहाच्या मूल्यात सातत्यानं हेराफेरी सुरू आहे. परदेशातील संस्थांच्या मदतीनं हा सगळा प्रकार सुरू आहे. तेच त्यांचं वैशिष्ट्य. काहीच बदललेलं नाही,' असं ट्विट सुचेता दलाल यांनी शनिवारी केलं. त्याचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले.पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर!
सुचेता दलाल यांच्या ट्विटचा परिणाम शेअर बाजार सुरू होताच लगेच दिसून आला. बाजाराचं कामकाज सुरू झाल्यानंतर अर्ध्या टक्क्याची घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३५० अंकांनी खाली आला. विशेष म्हणजे अदानी समूहाच्या ६ पैकी ५ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत ५ ते २० टक्क्यांची घसरण झाली. अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी गॅसच्या शेअर्सच्या मूल्यात लक्षणीय घट झाली.
अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्ससोबतच बजाज फायनान्सच्या शेअर्सच्या किमतीतही घसरण झाली. बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांची घट झाली. याशिवाय एनटीपीसी, डॉ. रेड्डीज, भारती एअरटेल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्सदेखील १ टक्क्यानं खाली आले. कोल इंडिया, इंडिया ओव्हरसीज बँक, कजारिया सिरॅमिक्स, ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज यांच्यासह ५० कंपन्यांचे तिमाही ताळेबंद आज जाहीर होणार आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.