Join us  

सेन्सेक्स घसरला

By admin | Published: August 11, 2016 2:12 AM

नफा वसुलीचा जबर फटका बसल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी ३१0 अंकांनी घसरून २८ हजार अंकांच्या खाली आला.

मुंबई : नफा वसुलीचा जबर फटका बसल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी ३१0 अंकांनी घसरून २८ हजार अंकांच्या खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १0३ अंकांनी घसरला. सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. तथापि, नंतर नफा वसुलीचे सत्र सुरू झाल्याने तो घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस ३१0.२८ अंकांची अथवा १.१0 टक्क्यांची घसरण नोंदवून तो २७,७७४.८८ अंकांवर बंद झाला. २४ जूननंतरची ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. त्या दिवशी ब्रिटनने युरोपीय युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,६00 अंकांच्या खाली आला आहे. १0२.९५ अंकांनी अथवा १.१९ टक्क्यांनी घसरलेला निफ्टी ८,५७५.३0 अंकांवर बंद झाला. युरोप आणि आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. आशियातील हाँगकाँग, दक्षिण कोरिया, सिंगापूर, तैवान येथील बाजार 0.0४ टक्के ते 0.५0 टक्के वाढले. चीन आणि जपानमधील निर्देशांक मात्र 0.२३ टक्क्यांपर्यंत घसरले. युरोपातील फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.0९ टक्के ते 0.२२ टक्के वाढले. (प्रतिनिधी)