Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६७ अंकांनी घसरला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६७ अंकांनी घसरला

ग्रीसमधील संकटाचा परिणाम झाल्यामुळे शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६७ अंकांनी घसरून २७,६४५.१५ अंकांवर बंद झाला.

By admin | Published: June 30, 2015 02:30 AM2015-06-30T02:30:12+5:302015-06-30T02:30:12+5:30

ग्रीसमधील संकटाचा परिणाम झाल्यामुळे शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६७ अंकांनी घसरून २७,६४५.१५ अंकांवर बंद झाला.

Sensex down 167 points in early trade | मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६७ अंकांनी घसरला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६७ अंकांनी घसरला

मुंबई : ग्रीसमधील संकटाचा परिणाम झाल्यामुळे शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६७ अंकांनी घसरून २७,६४५.१५ अंकांवर बंद झाला.
ग्रीस सरकारने बँका एक सप्ताहासाठी बंद करण्याचा, तसेच एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला. भारतीय बाजारही या संकटापासून अलिप्त राहू शकले नाहीत. रुपयात झालेल्या घसरणीचा फटकाही बाजारांना बसला. सलग दुसऱ्या सत्रात घसरण नोंदविताना सेन्सेक्सने ६0२.६५ अंकांची डुबकी मारली होती. सेन्सेक्स २७,२0९.१९ अंकांवर घसरला होता. तथापि, नंतर त्यात थोडी सुधारणा झाली. सत्राच्या अखेरीस २७,६४५.१५ अंकांवर तो बंद झाला. १६६.६९ अंकांची अथवा 0.६0 टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली.
५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरून ८२00 अंकांच्या खाली गेला होता. नंतर त्यात थोडी सुधारणा झाली. सत्राच्या अखेरीस ६२.७0 अंकांची अथवा 0.७५ टक्क्यांची घसरण नोंदवून तो ८,३१८.४0 अंकांवर बंद झाला.
युरोपीय बाजारांतही मोठी घसरण पाहायला मिळाली. जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन येथील बाजार १.६८ टक्के ते ३.३१ टक्के घसरले. आशियातील चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार १.४२ टक्के ते ३.३४ टक्के घसरले.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २३ कंपन्यांचे समभाग घसरले. घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत हिंदाल्को, एसबीआय, सन फार्मा, मारुती, टाटा मोटर्स, इन्फोसिस, भारती एअरटेल, ओएनजीसी, भेल, विप्रो, वेदांता, सिप्ला आणि एमअँडएम यांचा समावेश आहे.
या पडझडीच्या वातावरणात काही कंपन्यांचे समभाग मात्र आश्चर्यकारकरीत्या वाढले. एचयूएल, एनटीपीसी, आयटीसी यांचा त्यात समावेश आहे. (वृत्तसंस्था)

आजची घसरण व्यापक होती. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे १.४७ टक्के आणि १.३७ टक्के घसरले. बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली.
१,८0९ कंपन्यांचे समभाग घसरले. ८७0 कंपन्यांचे समभाग वाढले. ११८ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले.
बाजाराची एकूण उलाढाल घसरून २,५४५.६३ कोटी झाली. काल ती ३,0५५.९0 कोटी होती.

Web Title: Sensex down 167 points in early trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.