Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स घसरला २३ हजार अंकांच्या खाली

सेन्सेक्स घसरला २३ हजार अंकांच्या खाली

सेन्सेक्स गुरुवारी ८०७ अंकांनी खाली येऊन २३ हजाराच्या पायरीवर पोहोचला. गेल्या २१ महिन्यांतील ही त्याची नीचांकी पायरी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल व्यक्त होत असलेली

By admin | Published: February 12, 2016 03:47 AM2016-02-12T03:47:55+5:302016-02-12T03:47:55+5:30

सेन्सेक्स गुरुवारी ८०७ अंकांनी खाली येऊन २३ हजाराच्या पायरीवर पोहोचला. गेल्या २१ महिन्यांतील ही त्याची नीचांकी पायरी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल व्यक्त होत असलेली

Sensex down 23,000 points below | सेन्सेक्स घसरला २३ हजार अंकांच्या खाली

सेन्सेक्स घसरला २३ हजार अंकांच्या खाली

मुंबई : सेन्सेक्स गुरुवारी ८०७ अंकांनी खाली येऊन २३ हजाराच्या पायरीवर पोहोचला. गेल्या २१ महिन्यांतील ही त्याची नीचांकी पायरी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल व्यक्त होत असलेली काळजी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बुडीत कर्जासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीचा परिणाम गुंतवणूकदारांचे तब्बल तीन लाख कोटी रुपये बुडून सेन्सेक्स २३ हजार अंकांच्या खाली येण्यावर झाला.
एकाच दिवशी झालेली ही आठवी सगळ्यात मोठी घसरण ठरली. सेन्सेक्स ८०७.०७ अंकांनी खाली येऊन २२९५१.८३ अंकांवर येऊन थांबला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्रातील सरकारच्या कारकीर्दीतील ही ८ मे २०१४ नंतरची नीचांकी घसरण आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) निफ्टीचीही गेल्या सहा महिन्यांतील सर्वात मोठी घसरण होऊन ६,९७६.३५ ती पायरीवर आली. शिवाय सोन्याच्या किमती १८ महिन्यांत प्रथमच वधारल्या व त्यामुळे जागतिक बाजारात सोने हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित माध्यम बनले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ४५ पैशांनी घसरून २९ महिन्यांतील नीचांकी स्तरावर जात ६८.३० रुपयांवर स्थिर झाले.

सेन्सेक्समधील घसरणीचा ठपका सरकारने जागतिक घडामोडींवर ठेवला. यावर्षीची ही घसरण इतर बाजारांच्या घसरणीच्या तुलनेत केवळ दहाच टक्के आहे, असा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. तथापि, सेन्सेक्स ४ मार्च २०१५ रोजी ३० हजार अंकांवर गेला होता, तो २३ टक्क्यांपेक्षा जास्त खाली आला आहे. जागतिक बाजारपेठेत होत असलेल्या घडामोडी या देशाला काळजी करायला लावणाऱ्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Sensex down 23,000 points below

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.