मुंबई : नोटाबंदीमुळे शेअर बाजारांत सलग सातव्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २६३ अंकांनी घसरून २६ हजार अंकांच्या खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८ हजार अंकांच्या खाली आला. दोन्ही निर्देशांक एक महिन्याच्या नीचांकावर पोहोचले आहेत.मार्च २0१५ नंतरची ही सर्वाधिक दीर्घकाळ चालेली घसरण ठरली आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २६२.७८ अंकांनी अथवा १ टक्क्याने घसरून २५,९७९.६0 अंकांवर बंद झाला. २४ नोव्हेंबर नंतरचा नीचांकी बंद ठरला आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २५,८६0.१७ अंकांवर बंद झाला होता. गेल्या सत्रांत सेन्सेक्स ४५५.४४ अंकांनी घसरला आहे. ५0 कंपन्यांचा निफ्टी ८२.२0 अंकांनी अथवा १.0२ टक्क्याने घसरून ७,९७९.१0 अंकांवर बंद झाला. अदाणी पोर्ट्सचा समभाग सर्वाधिक ३.५६ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल टाटा स्टील, ओएनजीससी, भारती एअरटेल, टाटा स्टील, एनटीपीसी, एलअँडटी, इन्फोसिस एसबीआय यांचे समभाग घसरले. आयटीसी आणि एशियन पेंट्सचे समभाग वाढले. सेन्सेक्समधील ३0 पैकी २७ कंपन्यांचे समभाग घसरले.
सेन्सेक्स उतरला २६ हजारांच्या खाली
By admin | Published: December 23, 2016 1:39 AM