Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटीतील घसरणीने सेन्सेक्स ५८ अंकांनी उतरला

आयटीतील घसरणीने सेन्सेक्स ५८ अंकांनी उतरला

टीसीएसच्या तिमाही निकालाआधी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्यामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा जोर दिसून आला.

By admin | Published: October 14, 2015 12:34 AM2015-10-14T00:34:11+5:302015-10-14T00:34:11+5:30

टीसीएसच्या तिमाही निकालाआधी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्यामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा जोर दिसून आला.

Sensex down 58 points in IT; | आयटीतील घसरणीने सेन्सेक्स ५८ अंकांनी उतरला

आयटीतील घसरणीने सेन्सेक्स ५८ अंकांनी उतरला

मुंबई : टीसीएसच्या तिमाही निकालाआधी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्यामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा जोर दिसून आला. त्याचा फटका बसून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५८ अंकांनी घसरून २६,८४६.५३ अंकांवर बंद झाला.
चीनमधील आयातीत मोठी घट झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आशियातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारांत नरमाईचा कल दिसून आला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या बीएसई सेन्सेक्स दिवसभर अस्थिर होता. सत्राच्या अखेरीस त्याने ५७.५८ अंकांची अथवा 0.२१ टक्क्यांची घसरण नोंदविली व तो २६,८४६.५३ अंकांवर बंद झाला.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११.९0 अंकांनी अथवा 0.१५ टक्क्यांनी घसरून ८,१३१.७0 अंकांवर बंद झाला. निफ्टीही दिवसभर अस्थिर असल्याचे दिसून आले.
सकाळी दोन्ही बाजारांत मजबुतीचा कल दिसून येत होता. सूक्ष्म आर्थिक आकडेवारी सकारात्मक असल्याचा हा परिणाम होता. विशेषत: औद्योगिक उत्पादन ६.४ टक्क्यांनी वाढल्यामुळे बाजाराने चांगला प्रतिसाद दिला होता. सप्टेंबरमध्ये किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर ४.४१ टक्क्यांनी वाढल्याचा मात्र बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. हळूहळू विक्रीचा जोर वाढत गेला. त्यामुळे अंतिमत: बाजार खाली आला.
देशातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसचा समभाग अल्प वाढीसह २,५९७.४0 अंकांवर बंद झाला. घसरणीचा फटका बसलेल्या सेन्सेक्समधील कंपन्यांत ओएनजीसी, हिंदाल्को, वेदांता, टाटा स्टील, इन्फोसिस, भारती एअरटेल, गेल, सन फार्मा, एलअँडटी, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक आणि एचयूएल यांचा समावेश आहे. आशियाई बाजारांत नरमाईचा कल दिसून आला. जपानचा निक्केई आणि हाँगकाँगचा हँग सेंग १.११ टक्क्यांपर्यंत घसरले. युरोपीय बाजारांतही सकाळी नरमाईचाच कल दिसून आला. (वृत्तसंस्था)

Web Title: Sensex down 58 points in IT;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.