मुंबई : संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयकासह महत्त्वाची सुधारणा विधेयके संमत न होण्याची शक्यता दिसताच सोमवारी सेन्सेक्स १३५ अंकांनी खाली आला. गेल्या दोन आठवड्यांत एकाच दिवशी तो एवढा खाली येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सकाळच्या सत्रात महत्त्वाच्या विक्रीतून जो काही फायदा कमावला गेला होता तो नंतर भागीदारांनी विकल्यामुळे धुऊन निघाला व त्यामुळे सेन्सेक्स एवढा खाली आला. जागतिक पातळीवरही कल संमिश्रच होता. राज्यसभा आणि लोकसभेत सतत गोंधळामुळे कामकाज स्थगित करण्यात आले, त्यामुळे जीएसटी, भूसंपादन विधेयक हिवाळी अधिवेशनातच विचारात घेतले जातील या शक्यतेने गुंतवणूकदारांमध्ये घाबरगुंडी उडाली, असे दलालांचे म्हणणे आहे. बाजार सुरू झाला तो २८,२५०.७८ या उच्च अंकाने. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्यामुळे देशाचा तेल आयातीवरील खर्च कमी होईल या आशेच्या वातावरणात अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनी व्हॅल्यू बार्इंग केल्यामुळे दिवसभरातील २८,४१७.५९ या उच्चांकावर पोहोचला. दरम्यान, ब्रेंटचे कच्चे तेल सोमवारी सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी बॅरलमागे ३६ सेंटस्ने खाली येऊन ४८.२५ अमेरिकन डॉलरवर आले.- गुंतवणूकदारांनी कमी महत्त्वाचे शेअर व फंडस् विकल्यामुळे सकाळच्या सत्रातील फायदा धुऊन निघाला व सेन्सेक्स २८,०१७.८५ अंकांवर आला व नंतर २८,१०१.७२ अंकावर स्थिरावला. ही घसरण १३४.६७ अंक (०.४८ टक्के) झाली. २७ जुलैपासूनची ही मोठी घसरण आहे. बेंचमार्क सेन्सेक्स दिवसभरात ४०० अंकांनी फिरला. इंडेक्स शुक्रवारच्या सत्रात ६१.७४ अंकांनी गमावला गेला. ५० शेअर निफ्टी ८,६०० अंकांनी सावरला व दिवसभरातील उच्चांकावर म्हणजे ८,६२१.५५ वर स्थिरावला. दरम्यान तो ३९ अंकांनी खाली येऊन ८,५२५.६० वर आला होता.- विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गेल्या शुक्रवारी ९३.७४ कोटींचे निव्वळ शेअर विकले. देशी गुंतवणूकदारांनी ३४.०८ कोटींचे शेअर्स विकत घेतले.
सेन्सेक्स नीचांकी; १३५ अंकांनी खाली
By admin | Published: August 11, 2015 3:17 AM