Join us

नफावसुलीमुळे सेन्सेक्स घसरला

By admin | Published: October 21, 2015 4:16 AM

सलग तीन सत्रांच्या तेजीनंतर मंगळवारी शेअर बाजारांत नफावसुलीमुळे घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५८ अंकांनी घसरला. नफावसुलीमुळे धातू, तेल व गॅस

मुंबई : सलग तीन सत्रांच्या तेजीनंतर मंगळवारी शेअर बाजारांत नफावसुलीमुळे घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५८ अंकांनी घसरला. नफावसुलीमुळे धातू, तेल व गॅस आणि औषधी या क्षेत्रात विक्रीचा मारा झाला. जागतिक पातळीवर संमिश्र कल पाहायला मिळाला.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता; मात्र लगेच विक्रीचा मारा सुरू झाल्याने तो खाली घसरला. सेन्सेक्स २७,२१६.४0 अंकांपर्यंत घसरला होता.सत्राच्या मध्यास सेन्सेक्स पुन्हा तेजीत आला. तो २७,४३२.0७ अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर मात्र नफा वसुलीचा जोर वाढल्याने तो पुन्हा खाली आला. सत्राच्या अखेरीस ५८.0९ अंकांची अथवा 0.२१ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २७,३0६.८३ अंकांवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ५८५ अंकांची वाढ नोंदविलीआहे.५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी १३.४0 अंकांनी अथवा 0.१६ टक्क्यांनी घसरला व ८,२६१.६५ अंकांवर बंद झाला. मोटारसायकल निर्माती कंपनी हीरो मोटोकॉर्पचा समभाग 0.७१ टक्क्यांनी घसरला. धातू क्षेत्रातील वेदांता, टाटा स्टील आणि हिंदाल्को या कंपन्यांचे समभाग ६.४२ टक्क्यांपर्यंत घसरले.घसरण झालेल्या अन्य कंपन्यांत ओएनजीसी, सिप्ला, एमअँडएम, आरआयएल, बजाज आॅटो आणि सन फार्मा यांचा समावेश आहे. टीसीएस, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, इन्फोसिस आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या समभागांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन घसघशीत वाढ नोंदविली. त्यामुळे सेन्सेक्सच्या घसरणीला लगाम लागला.क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई धातू निर्देशांक सर्वाधिक १.८0 टक्के घसरला. त्याखालोखाल तेल व गॅस, जमीनजुमला, आरोग्य सेवा, सार्वजनिक क्षेत्र आणि गतिमान ग्राहक वस्तू या क्षेत्रांचे निर्देशांक घसरले. (वृत्तसंस्था)