Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स दोन आठवड्यांच्या नीचांकावर

सेन्सेक्स दोन आठवड्यांच्या नीचांकावर

चिनी अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे जागतिक पातळीवरील शेअर बाजार विस्कळीत झाले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३ अंकांनी घसरून २५,५८0.३४ अंकांवर बंद झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 11:43 PM2016-01-05T23:43:44+5:302016-01-05T23:43:44+5:30

चिनी अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे जागतिक पातळीवरील शेअर बाजार विस्कळीत झाले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३ अंकांनी घसरून २५,५८0.३४ अंकांवर बंद झाला.

Sensex down at two-week low | सेन्सेक्स दोन आठवड्यांच्या नीचांकावर

सेन्सेक्स दोन आठवड्यांच्या नीचांकावर

मुंबई : चिनी अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे जागतिक पातळीवरील शेअर बाजार विस्कळीत झाले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३ अंकांनी घसरून २५,५८0.३४ अंकांवर बंद झाला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २५,७४४.७0 अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो २५,७६६.७६ अंकांपर्यंत वर चढला. त्यानंतर तो घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस ४३.0१ अंकांची अथवा 0.१७ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २५,५८0.३४ अंकांवर बंद झाला. १८ डिसेंबर नंतरची ही सर्वांत नीचांकी पातळी ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २५,५१९.२२ अंकांवर बंद झाला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सकाळी तेजीत होता. एका क्षणी तो ७,८३१.२0 अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर मात्र तो घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस ६.६५ अंकांची अथवा 0.0९ टक्क्यांची घसरण नोंदवून तो ७,७८४.६५ अंकांवर बंद झाला.

Web Title: Sensex down at two-week low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.