मुंबई : महत्वाच्या आर्थिक सुधारणांना आकार न येण्याची चिन्हे दिसताच बाँबे स्टॉक एक्स्चेंजचा (बीएसई) निर्देशांक मंगळवारी २३६ अंकांनी खाली येऊन २८,००० च्या पायरीवर आला.संसदेचे पावसाळी अधिवेशन संपायला आता केवळ दोनच दिवस उरले असून महत्वाचे वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) आणखी लांबणीवर पडणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यसभेत सरकारने मंगळवारी जीएसटी विधेयक मांडताच कामकाज तहकूब झाले. हेम सिक्युरिटीजचे संचालक गौरव जैन म्हणाले की स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नफ्यात घट झाल्यामुळे आशांवर पाणी पडले. वस्तुंच्या सतत कमी होणाऱ्या किमती आणि रुपयाची घटती किमत यामुळेही हा परिणाम झाला. सेन्सेक्स गेल्या तीन सत्रांत ४३२.०४ अंकांनी खाली आला.
सेन्सेक्स घसरला
By admin | Published: August 12, 2015 2:14 AM