Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स १0४ अंकांनी घसरला

सेन्सेक्स १0४ अंकांनी घसरला

४ महिन्यांच्या उच्चांकावरून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची मंगळवारी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला

By admin | Published: February 8, 2017 02:08 AM2017-02-08T02:08:25+5:302017-02-08T02:08:25+5:30

४ महिन्यांच्या उच्चांकावरून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची मंगळवारी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला

The Sensex dropped by 104 points | सेन्सेक्स १0४ अंकांनी घसरला

सेन्सेक्स १0४ अंकांनी घसरला

मुंबई : ४ महिन्यांच्या उच्चांकावरून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची मंगळवारी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला. नफा वसुलीचा फटका बाजारांना बसला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १0४.१२ अंकांनी अथवा 0.३७ टक्क्यांनी घसरून २८,३३५.१६ अंकांवर बंद झाला. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्स ७८३.३२ अंकांनी वाढला होता.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ३२.७५ अंकांनी अथवा 0.३७ टक्क्यांनी घसरून ८,७६८.३0 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३0पैकी २0 कंपन्यांचे समभाग घसरले. १0 कंपन्यांचे समभाग वाढले. टाटा मोटर्सचा समभाग सर्वाधिक घसरला. त्याखालोखाल कोल इंडिया, ओएनजीसी, अदाणी पोर्ट्स, लुपीन, गेल, डॉ. रेड्डीज, आरआयएल, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग घसरले. वाढ नोंदविणाऱ्या कंपन्यांत इन्फोसिस, एलअ‍ॅण्डटी, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, एचडीएफसी, आयटीसी यांचा समावेश आहे.

Web Title: The Sensex dropped by 104 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.