Join us

सेन्सेक्स १0४ अंकांनी घसरला

By admin | Published: February 08, 2017 2:08 AM

४ महिन्यांच्या उच्चांकावरून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची मंगळवारी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला

मुंबई : ४ महिन्यांच्या उच्चांकावरून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची मंगळवारी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला. नफा वसुलीचा फटका बाजारांना बसला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १0४.१२ अंकांनी अथवा 0.३७ टक्क्यांनी घसरून २८,३३५.१६ अंकांवर बंद झाला. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्स ७८३.३२ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ३२.७५ अंकांनी अथवा 0.३७ टक्क्यांनी घसरून ८,७६८.३0 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0पैकी २0 कंपन्यांचे समभाग घसरले. १0 कंपन्यांचे समभाग वाढले. टाटा मोटर्सचा समभाग सर्वाधिक घसरला. त्याखालोखाल कोल इंडिया, ओएनजीसी, अदाणी पोर्ट्स, लुपीन, गेल, डॉ. रेड्डीज, आरआयएल, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग घसरले. वाढ नोंदविणाऱ्या कंपन्यांत इन्फोसिस, एलअ‍ॅण्डटी, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, एचडीएफसी, आयटीसी यांचा समावेश आहे.