Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स १४३ अंकांनी घसरला

सेन्सेक्स १४३ अंकांनी घसरला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १४३ अंकांनी घसरून २४,६८२.0३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा मागील १९ महिन्यांचा नीचांक ठरला आहे. सूक्ष्म आर्थिक डाटा आणि आयटी

By admin | Published: January 13, 2016 03:18 AM2016-01-13T03:18:05+5:302016-01-13T03:18:05+5:30

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १४३ अंकांनी घसरून २४,६८२.0३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा मागील १९ महिन्यांचा नीचांक ठरला आहे. सूक्ष्म आर्थिक डाटा आणि आयटी

The Sensex dropped by 143 points | सेन्सेक्स १४३ अंकांनी घसरला

सेन्सेक्स १४३ अंकांनी घसरला


मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १४३ अंकांनी घसरून २४,६८२.0३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा मागील १९ महिन्यांचा नीचांक ठरला आहे. सूक्ष्म आर्थिक डाटा आणि आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी टीसीएसच्या तिमाही कामगिरीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी बाजारातील सतर्कतेचा निर्देशांकांना फटका बसला आहे.
मंगळवारच्या घसरणीमुळे मोदी सरकारने शपथ घेतल्यानंतरच्या काळात म्हणजेच २६ मे २0१४ नंतर कमावलेले सर्व लाभ निर्देशांकांनी गमावले आहेत.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीत होता. ५७ अंकांची वाढ त्याने मिळविली होती. त्यानंतर मात्र निर्देशांक घसरणीला लागला. सत्राच्या मध्यास तो २४,५९७.११ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या अखेरीस १४३.0१ अंकांची अथवा 0.५८ टक्क्यांची घसरण नोंदवून २४,६८२.0३ अंकांवर तो बंद झाला. ३0 मे २0१४ नंतरचा हा नीचांकी बंद ठरला आहे. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५00 अंकांच्या खाली घसरून ७,४८७.८0 अंकांपर्यंत उतरला होता. सत्राच्या अखेरीस निफ्टी ५३.५५ अंकांनी अथवा 0.७१ टक्क्यांनी घसरून ७,५१0.३0 अंकांवर बंद झाला. बँकिंग, रिअल्टी, मेटल, इन्फ्रास्ट्रक्चर, आॅईल अँड गॅस, पीएसयू आणि आयटी या क्षेत्राला घसरणीचा मोठा फटका बसला. घसरलेल्या बड्या कंपन्यांत अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील यांचा समावेश आहे. एसबीआय, ओएनजीसी, एअरटेल, टीसीएस, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक, गेल, एचडीएफसी बँक, बजाज आॅटो, एचडीएफसी, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, आरआयएल आणि मारुती सुझुकी यांचे समभागही घसरले.
या पडझडीच्या वातावरणातही काही कंपन्यांचे समभाग मात्र वाढले. त्यात प्रामुख्याने एनटीपीसी, विप्रो, एमअँडएम, अदाणी पोर्टस्, एचयूएल आणि सन फार्मा यांचा समावेश आहे.
क्षेत्रनिहाय विचार करता बँकिंग क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. त्या खालोखाल रिअल्टी, इन्फ्रा, मेटल, आॅईल अँड गॅस, आयटी आणि आॅटो निर्देशांक घसरले. व्यापक बाजारांतही घसरण पाहायला मिळाली. मीडकॅप १.0३ टक्के, तर स्मॉलकॅप 0.९४ टक्के घसरला.

 

Web Title: The Sensex dropped by 143 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.