Join us  

सेन्सेक्स २०५ अंकांनी घसरला

By admin | Published: July 22, 2016 3:40 AM

शेअर बाजारात गुरुवारी एक महिन्यातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली.

मुंबई : शेअर बाजारात गुरुवारी एक महिन्यातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. निर्देशांक २०५ अंकांनी घसरून २७,७१०.५२ अंकावर बंद झाला. एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेच्या अनुत्पादित कर्जात वाढ होत असल्याने ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. बहुप्रतीक्षित जीएसटी विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मंजूर होण्याच्या शक्यतेनेही गुंतवणूकदारांनी सतर्कता बाळगली. खासगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक एचडीएफसीचा शेअर ०.३० टक्क्याने घसरून १,२२८.४५ वर पोहोचला, तर बँकेचा नफा २०.१५ टक्क्यांनी वाढून ३,२३८.९१ कोटी रुपये आहे. कोटक महिंद्रा बँकेचा शेअर २.७१ टक्क्यांनी घसरून ७६०.८० वर बंद झाला, तर बँकेचा शुद्ध नफा चारपट वाढला.