Join us

सेन्सेक्स २८६ अंकांनी घसरला

By admin | Published: February 03, 2016 2:55 AM

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत पुन्हा एकदा घसरण झाल्यामुळे तसेच रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे मंगळवारी शेअर बाजार पुन्हा घसरले.

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत पुन्हा एकदा घसरण झाल्यामुळे तसेच रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे मंगळवारी शेअर बाजार पुन्हा घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८५.८३ अंकांनी घसरून २४,५३९ अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह २४,८६८.२१ अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे व्याजदर जैसे थे असल्याचे वृत्त आले. त्यामुळे बाजार घसरला.सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स २८५.८३ अंकांनी अथवा १.१५ टक्क्यांनी घसरून २४,५३९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १00.४0 अंकांनी अथवा १.३३ टक्क्यांनी घसरून ७,४५५.५५ अंकांवर बंदझाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २५ कंपन्यांचे समभाग घसरले. घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत टाटा स्टील, एनटीपीसी, भेल, सिप्ला, सन फार्मा, ओएनजीसी, कोल इंडिया, आरआयएल, आयसीआयसीआय बँक, अदाणी पोर्टस्, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, एमअँडएम, मारुती सुझुकी आणि गेल इंडिया यांचा समावेश आहे.व्यापक बाजारातही घसरणीचाच कल दिसून आला. मीडकॅप निर्देशांक १.७४ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप १.२५ टक्क्यांनी घसरला. अन्य आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. चीनचा शांघाय कंपोजिट २.२६ टक्क्यांनी वाढला. जपानचा निक्केई 0.६४ टक्क्यांनी, तर हाँगकाँगचा हँग सेंग 0.७६ टक्क्यांनी घसरला. युरोपातही सकाळी नरमाईचा कल दिसून येत होता. (वृत्तसंस्था)