मुंबई : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२४ अंकांनी घसरून २७,६0७.८२ अंकांवर बंद झाला.
आशियाई बाजारात घसरणीचा कल दिसून आला. चीनमधील शांघाय कंपोजिट निर्देशांक ३.४३ टक्क्यांनी घसरला. युरोपीय बाजार सकाळी १.२४ टक्क्यापर्यंत घसरण दर्शवीत होते. रुपया दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. त्यातच अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीच्या दिशेने चालली असल्याचे समोर आले आहे. तब्बल एक दशकानंतर अमेरिकेत व्याजदर वाढणार आहेत. याशिवाय जागतिक बाजारात कच्चे तेलही १.५९ टक्क्याने घसरले आहे. या सर्वांचा परिणाम बाजारावर दिसून आला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर मात्र तो लगेचच घसरणीला लागला. विक्रीचा जोर वाढल्यामुळे तो २७,५६४.१६ अंकांपर्यंत खाली आला होता. सत्राच्या अखेरीस तो २७,६0७.८२ अंकांवर बंद झाला. ३२३.८२ अंकांची अथवा १.१६ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी ८,४00 अंकांच्या खाली घसरला. १२२.४0 अंकांची अथवा १.४४ टक्क्याची घसरण नोंदवून निफ्टी ८३७२.७५ अंकांवर बंद झाला. २७ जुलैनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण ठरली आहे.
क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक ४.१३ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल धातू, बँकिंग, आयटी, पीएसयू, इन्फ्रा, ऊर्जा, टिकाऊ वस्तू आणि भांडवली वस्तू या क्षेत्रांत घसरण झाली.
दरम्यान, विदेशी गुंतवणूकदारांनी काल ४२३.७२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याचे आज जाहीर झालेल्या हंगामी आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
सेन्सेक्स ३२४ अंकांनी घसरला
जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२४ अंकांनी घसरून २७,६0७.८२ अंकांवर बंद झाला.
By admin | Published: August 20, 2015 11:02 PM2015-08-20T23:02:19+5:302015-08-21T00:15:47+5:30