Join us

सेन्सेक्स ४९ अंकांनी घसरला

By admin | Published: August 02, 2016 4:56 AM

सोमवारी शेअर बाजारात पुन्हा पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९ अंकांनी घसरून २८,00३.१२ अंकांवर बंद झाला.

मुंबई : सोमवारी शेअर बाजारात पुन्हा पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९ अंकांनी घसरून २८,00३.१२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुमारे २ अंकांनी घसरला. वस्तुत: सकाळी बाजारात तेजी होती. सेन्सेक्स २८,0८३.0८ अंकांपर्यंत वर चढला होता. तथापि, ही तेजी नंतर टिकली नाही. विक्रीचा मारा वाढल्यानंतर सेन्सेक्स ४८.७४ अंकांनी अथवा 0.१७ टक्क्यांनी घसरून २८,00३.१२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १.९५ अंकांनी अथवा 0.0२ टक्क्यांनी घसरून ८,६३६.५५ अंकांवर बंद झाला. व्यापक बाजारांत मात्र तेजी दिसून आली. बीएसई मीडकॅप 0.३४ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप 0.१0 टक्क्यांनी वाढला. मारुती सुझुकीचा समभाग सर्वाधिक २.४१ टक्क्यांनी वाढला. कंपनीचा समभाग ४,८६९.८0 अंकांवर असून, ही त्याची सार्वकालिक सर्वोच्च पातळी आहे. आशियाई बाजारात संमिश्र कल होता. जपानचा निक्केई 0.४0 टक्क्यांनी, तर हाँगकाँगचा हँग सेंग १.0९ टक्क्यांनी वाढला. चीनचा शांघाय कंपोजिट मात्र 0.८७ टक्क्यांनी घसरला. युरोपीय बाजारातही संमिश्र कल पाहायला मिळाला. लंडनचा एफटीएसई आणि पॅरिसचा कॅक अनुक्रमे 0.0४ टक्क्यांनी आणि 0.५१ टक्क्यांनी घसरले. याउलट फ्रँकफूर्टचा डॅक्स 0.२0 टक्क्यांनी वाढला. (प्रतिनिधी)