मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकी आधीच्या सत्रात मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५४ पेक्षा जास्त अंकांनी घसरून २७,८७६.६१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र जवळपास सपाट पातळीवर बंद झाला.आयटी आणि टेक कंपन्यांच्या समभागात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचा फटका सेन्सेक्सला बसला, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. निक्केईच्या वतीने जारी करण्यात येणाऱ्या मॅन्यूफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ५२.१ टक्क्यांवरून ५४.४ टक्क्यांवर गेला आहे. मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्राचा वृद्धी दर २२ महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. त्यामुळे सकाळी सेन्सेक्स तेजीत होता. तथापि, ही तेजी त्याला कायम ठेवता आली नाही. तो घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस ५३.६0 अंकांची अथवा 0.१९ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २७,८७६.६१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी 0.५५ अंकांची अथवा 0.0१ टक्क्यांची वाढ नोंदवून ८,६२६.२५ अंकांवर बंद झाला.आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. युरोपीय बाजारांतही सकाळी संमिश्र कल पाहायला मिळाला. (प्रतिनिधी)सेन्सेक्समधील 30 पैकी पैकी कंपन्यांचे समभाग घसरले. 10कंपन्यांचे समभाग वाढले. घसरलेल्या बड्या कंपन्यांत अॅक्सिस बँक, टीसीएस, सन फार्मा, इन्फोसिस, सिप्ला, विप्रो, टीसीएस आणि एलअँडटी यांचा समावेश आहे. टाटा स्टीलचा समभाग मात्र 3.23टक्क्यांनी वाढला. वाढ मिळविणाऱ्या अन्य कंपन्यांत एचडीएफसी, एनटीपीसी, कोल इंडिया, पॉवर ग्रीड आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे.
सेन्सेक्स ५४ अंकांनी घसरला
By admin | Published: November 02, 2016 6:12 AM