मुंबई : ब्रेक्झिटबाबतच्या चिंता आणि युरोपातील वित्तीय स्थिती यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी सुमारे ११५ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे ३४ अंकांनी घसरला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ११४.७७ अंकांनी अथवा 0.४१ टक्क्यांनी घसरून २८,१0६.२१ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स ११४ अंकांनी घसरला होता. युरोपीय केंद्रीय प्रोत्साहन पॅकेज मागे घेण्याच्या विचारात असल्याच्या वृत्तामुळे बाजारांत निराशा पसरली आहे. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी ३४.४0 अंकांनी अथवा 0.३९ टक्क्यांनी घसरून ८,७0९.५५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक २.४२ टक्क्यांनी खाली आले. त्याखालोखाल सिप्ला, एमअँडएम, पॉवर ग्रीड, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज यांचे समभाग घसरले. सेन्सेक्समधील ३0 पैकी २२ कंपन्यांचे समभाग घसरले. ८ कंपन्यांचे समभाग वाढले. व्यापक बाजारांतही घसरणीचाच कल दिसून आला. मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.५६ अंकांनी व 0.४८ अंक घसरले. (प्रतिनिधी)
नफा वसुलीमुळे घसरला सेन्सेक्स
ब्रेक्झिटबाबतच्या चिंता आणि युरोपातील वित्तीय स्थिती यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी सुमारे ११५ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे ३४ अंकांनी
By admin | Published: October 7, 2016 02:21 AM2016-10-07T02:21:22+5:302016-10-07T02:21:22+5:30