मुंबई : जागतिक पातळीवरील संमिश्र कल आणि जानेवारीमधील डेरिव्हेटिव्ह सौद्यांची समाप्ती यामुळे बुधवारी शेअर बाजारात शांतता दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी जवळपास सपाट पातळीवर बंद झाले.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स गेल्या दोन सत्रांत ५२३.७४ अंकांनी वाढला होता. बुधवारी तो फक्त ६.४४ अंकांनी अथवा 0.0३ टक्क्याने वाढून २४,४९२.३९ अंकांवर बंद झाला. त्याआधी सेन्सेक्स १६0 अंकांनी वाढून २४,६२४.७0 अंकांवर पोहोचला होता. तथापि, ही वाढ त्याला टिकवून ठेवता आली नाही.
व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १.६0 अंकांनी अथवा 0.0२ टक्क्याने वाढून ७,४३७.७५ अंकांवर बंद झाला.
सोमवारी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ९१.१५ कोटी रुपयांचे समभाग विकल्याचे स्पष्ट झाले. सेन्सेक्समधील एनटीपीसी, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, विप्रो, आयटीसी लि., टीसीएस, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस यांचे समभाग वाढले.
महिनाअखेरीस सेन्सेक्स, निफ्टीला मरगळ
जागतिक पातळीवरील संमिश्र कल आणि जानेवारीमधील डेरिव्हेटिव्ह सौद्यांची समाप्ती यामुळे बुधवारी शेअर बाजारात शांतता दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2016 01:52 AM2016-01-28T01:52:01+5:302016-01-28T01:52:01+5:30