Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVirus: शेअर बाजार उसळला; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये वाढ

CoronaVirus: शेअर बाजार उसळला; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये वाढ

रिलायन्स जिओमध्ये फेसबुक गुंतवणूक करणार असल्याच्या बातमीने मुंबई शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:41 AM2020-04-23T01:41:06+5:302020-04-23T01:41:18+5:30

रिलायन्स जिओमध्ये फेसबुक गुंतवणूक करणार असल्याच्या बातमीने मुंबई शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण

Sensex ends up by 742 points Nifty just below 9200 mark | CoronaVirus: शेअर बाजार उसळला; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये वाढ

CoronaVirus: शेअर बाजार उसळला; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये वाढ

मुंबई : रिलायन्स जिओमध्ये फेसबुक गुंतवणूक करणार असल्याच्या बातमीने मुंबई शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स हा ७४२ अंशांनी वाढून ३१ हजार ३०० चा टप्पा पार करून गेला. विशेष म्हणजे बाजाराचे सर्वच निर्देशांक हे हिरव्या रंगामध्ये बंद झालेले दिसले.

मुंबई शेअर बाजार बुधवारी वाढीव पातळीवर सुरू झाला. मात्र नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स ३०,५७८.५५ अंशांपर्यंत खाली गेला. त्यानंतर मात्र बाजारात तेजी होती. युरोपियन शेअर बाजारांमध्ये प्रारंभी तेजी दिसल्याने बाजाराचे चित्र पालटले. दिवसअखेर संवेदनशील निर्देशांक ७४२.८४ अंश म्हणजेच २.४२ टक्के वाढून ३१,३७९.५५ अंशांवर बंद झाला.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक (निफ्टी) २.२९ टक्के म्हणजेच २०५.८५ अंशांनी वाढून ९,१८७.३० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ०.७८ आणि ०.७३ टक्के वाढ झाली. रिलायन्सला मागणी वाढल्याने हे समभाग तेजीत होते. दिवसभरात त्याच्या मूल्यामध्ये १०.३० टक्के वाढ झाली.

Web Title: Sensex ends up by 742 points Nifty just below 9200 mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.