Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स ६१६ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; TATA च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री

सेन्सेक्स ६१६ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; TATA च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री

सोमवारी शेअर बाजाराच्या चढ उतारादरम्यान, कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 616 अंकांनी घसरला आणि 73502 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 04:06 PM2024-03-11T16:06:13+5:302024-03-11T16:06:31+5:30

सोमवारी शेअर बाजाराच्या चढ उतारादरम्यान, कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 616 अंकांनी घसरला आणि 73502 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Sensex falls by 616 points Nifty also down Huge sell off in TATA s shares share market sensex | सेन्सेक्स ६१६ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; TATA च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री

सेन्सेक्स ६१६ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; TATA च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री

Closing Bell Today - सोमवारी शेअर बाजाराच्या चढ उतारादरम्यान, कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 616 अंकांनी घसरला आणि 73502 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 161 अंकांनी घसरून 22332 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकसह सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारात कामकाजादरम्यान अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ आणि सिप्ला यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
 

सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज मोठ्या घसरणीसह बंद झालं. शेअर बाजार दिवसभर रेड झोनमध्येच व्यवहार करत होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना बंपर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर, गौतम अदानी समूहाच्या 10 लिस्टेड कंपन्यांपैकी पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण आणि पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
 

अदानी समूहाच्या एसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आहे आणि हा शेअर 9 रुपयांच्या वाढीसह बंद झाला आहे, तर अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये 9 रुपयांची घसरण झाली.
 

सोमवारी मुथूट फायनान्स, बजाज फायनान्स आणि आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली. एसबीआय कार्ड, ॲक्सिस बँक, फेडरल बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, देवयानी, एचडीएफसी बँक आणि पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली.

Web Title: Sensex falls by 616 points Nifty also down Huge sell off in TATA s shares share market sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.