Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाची उसळी...सेन्सेक्सची गटांगळी! तब्बल ९०० अंकांची घसरण, गुंतवणूकदार बुडाले

कोरोनाची उसळी...सेन्सेक्सची गटांगळी! तब्बल ९०० अंकांची घसरण, गुंतवणूकदार बुडाले

चीनमध्ये कोरोनाची परिस्थितीची नियंत्रणाबाहेर गेली आहे. तर जपान, अमेरिकेसह इतर काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 04:58 PM2022-12-23T16:58:30+5:302022-12-23T16:59:18+5:30

चीनमध्ये कोरोनाची परिस्थितीची नियंत्रणाबाहेर गेली आहे. तर जपान, अमेरिकेसह इतर काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Sensex Falls Over 900 Points Amid COVID Surge In Some Countries | कोरोनाची उसळी...सेन्सेक्सची गटांगळी! तब्बल ९०० अंकांची घसरण, गुंतवणूकदार बुडाले

कोरोनाची उसळी...सेन्सेक्सची गटांगळी! तब्बल ९०० अंकांची घसरण, गुंतवणूकदार बुडाले

मुंबई-

चीनमध्ये कोरोनाची परिस्थितीची नियंत्रणाबाहेर गेली आहे. तर जपान, अमेरिकेसह इतर काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये ऐतिहासिक गटांगळी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये आज दुपारच्या सत्रात तब्बल ९२५ अंकांची घसरण झाली आहे. या घसरणीसह सेन्सेक्स ५९,९०० रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे निफ्टीतही ३०० अंकांची घसरण झाली आहे. निफ्टी सध्या १७,८२१ अंकांवर व्यवहार करत आहे. 

शेअर बाजारात आज मुख्यत्वे टाटा मोटर्स, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि पावर ग्रीड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 

अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. दरम्यान, हिंडेल्को आणि अदानी एन्टरप्राइझेसच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांनी पडझड पाहायला मिळाली आहे.

Web Title: Sensex Falls Over 900 Points Amid COVID Surge In Some Countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.