मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी सलग सहाव्या दिवशी तेजीत राहिला. ३६.२0 अंकांची अथवा 0.१४ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २५,८८0.३८ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स दिवसभर चढ-उतार दर्शवीत होता. एका क्षणी १५ आठवड्यांचा उच्चांक करताना तो २६ हजार अंकांच्या वर चढला होता. तथापि, नंतर तो घसरला आणि २६ हजार अंकांच्या खालीच बंद झाला. आधीच्या पाच दिवसांत सेन्सेक्सने १,१७0 अंकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र २.७0 अंकांनी अथवा 0.0३ टक्क्यांनी घसरून ७,९१२.0५ अंकांवर बंद झाला. आधीच्या सहा सत्रांत निफ्टी तेजीत होता. त्याने ३६८.३0 अंकांची अथवा ४.८८ टक्क्यांची वाढ मिळविली होती. आशियाई बाजारांत तेजीचे वातावरण राहिले.
सेन्सेक्स सहाव्या दिवशीही तेजीत
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी सलग सहाव्या दिवशी तेजीत राहिला. ३६.२0 अंकांची अथवा 0.१४ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २५,८८0.३८ अंकांवर बंद झाला.
By admin | Published: April 22, 2016 02:48 AM2016-04-22T02:48:41+5:302016-04-22T02:48:41+5:30