मुंबई : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून आज ना उद्या व्याजदर वाढ केली जाण्याची भीती कायम असल्यामुळे भारतीय शेअर बाजार बुधवारी कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११४ अंकांनी कोसळून २८,६२२.१२ अंकांवर बंद झाला.
फेडरल रिझर्व्हची दोनदिवसीय बैठक सुरू असून, या बैठकीत व्याजदर वाढ केली जाण्याची शक्यता नाही. तरीही दरवाढ आता अपरिहार्यच आहे. फार फार तर दोन महिन्यांपर्यंत ती टाळता येऊ शकेल, असे सध्याचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या उलथापालथी होऊ शकतात. बुधवारी त्याची एक चुणूक दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २८,७६६.८७ अंकांवर तेजीसह उघडला होता. नंतर तो आणखी वर चढून २८,८0६.९७ अंकांवर पोहोचला. विदेशी गुंतवणुकीचा बाजारातील ओघही उत्तम होता. त्यानंतर मात्र अचानक विक्रीचा जोर वाढला. त्यामुळे सेन्सेक्स घसरणीला लागला. २८,५४६.७६ अंकांपर्यंत तो घसरला. सत्र अखेरीस थोडी सुधारणा होऊन तो २८,६२२.१२ अंकांवर बंद झाला. ११४.२६ अंकांची अथवा 0.४0 टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. काल सेन्सेक्स २९९ अंकांनी वाढला होता. ही वाढ त्याला टिकविता आली नाही. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३७.४0 अंकांनी अथवा 0.४३ टक्क्यांनी घसरून ८,६८५.९0 अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारांपैकी चीन, हाँगकाँग, जपान आणि तैवान येथील बाजार 0.५५ टक्के ते २.१३ टक्के वाढले. सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचे बाजार मात्र घसरले. युरोपातील फ्रान्स आणि जर्मनीचे बाजार 0.१७ टक्के ते 0.२५ टक्के घसरले. ब्रिटनचा एफटीएसई मात्र 0.६२ टक्क्यांनी वर चढला.
४सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १८ कंपन्यांचे समभाग घसरले. १२ कंपन्यांचे समभाग वाढले.
४घसरणीचा फटका बसलेल्या कंपन्यांत एनटीपीसी, भेल, टाटा मोटर्स, विप्रो, ओएनजीसी, भारती एअरटेल, एचडीएफसी, एमअँडएम आणि एचयूएल यांचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, हीरो मोटोकॉर्प आणि कोल इंडिया यांचे समभाग वाढले.
४बाजाराची एकूण व्याप्ती कमजोर राहिली. १,८८५ कंपन्यांचे समभाग घसरले. १,२६२ कंपन्यांचे समभाग वर चढले. १४१ कंपन्यांचे समभाग आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिले.
सेन्सेक्स ११४ अंकांनी घसरला
भारतीय शेअर बाजार बुधवारी कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११४ अंकांनी कोसळून २८,६२२.१२ अंकांवर बंद झाला.
By admin | Published: March 18, 2015 11:17 PM2015-03-18T23:17:21+5:302015-03-18T23:17:21+5:30