Lokmat Money > बिझनेस न्यूज > नफा वसुलीमुळे सेन्सेक्स ११७ अंकांनी घसरला

नफा वसुलीमुळे सेन्सेक्स ११७ अंकांनी घसरला

भांडवली वस्तू आणि बँकिंग क्षेत्रात झालेल्या नफा वसुलीचा फटका बुधवारी शेअर बाजारांना बसला.

By admin | Published: February 5, 2015 02:31 AM2015-02-05T02:31:49+5:302015-02-05T02:31:49+5:30

भांडवली वस्तू आणि बँकिंग क्षेत्रात झालेल्या नफा वसुलीचा फटका बुधवारी शेअर बाजारांना बसला.

The Sensex fell by 117 points due to profit-booking | नफा वसुलीमुळे सेन्सेक्स ११७ अंकांनी घसरला

नफा वसुलीमुळे सेन्सेक्स ११७ अंकांनी घसरला

मुंबई : भांडवली वस्तू आणि बँकिंग क्षेत्रात झालेल्या नफा वसुलीचा फटका बुधवारी शेअर बाजारांना बसला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११७.0३ अंकांनी घसरून २८,८८३.११ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स २९ हजारांच्या खाली आल्यामुळे बाजारात निराशा पसरली आहे.
बाजारातील वातावरण अत्यंत अस्थिर होते. शेवटच्या अर्ध्या तासात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सेन्सेक्स आपटला. सेन्सेक्स सलग चार दिवसांपासून घसरत आहे. या चार दिवसांत २.६९ टक्क्यांची घसरण सोसणाऱ्या सेन्सेक्सने ७९८.६६ अंक गमावले. ५0 कंपन्यांवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ३२.८५ अंकांनी म्हणजेच 0.३८ टक्क्याने घसरला. सत्रअखेरीस तो ८,७२३.७0 अंकांवर बंद झाला.
ब्रोकरांनी सांगितले की, विविध गटांचा विचार केल्यास आजचे
सत्र संमिश्र स्वरूपाचे होते असे
दिसते. (प्रतिनिधी)

च्आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.२८ टक्का ते १.९८ टक्क्यावर चढले.
च्या उलट चीनचा शांघाय कॉम्पॅक्ट 0.९८ अंकाने घसरला. युरोपातील फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.0५ टक्का ते 0.३५ टक्का घसरले.
च्रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे बाजार अस्थिर झाला आहे.

Web Title: The Sensex fell by 117 points due to profit-booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.