Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरला

सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरला

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३३.0६ अंकांनी कोसळला.

By admin | Published: February 7, 2015 02:52 AM2015-02-07T02:52:18+5:302015-02-07T02:52:18+5:30

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३३.0६ अंकांनी कोसळला.

The Sensex fell by 133 points | सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरला

सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरला

मुंबई : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३३.0६ अंकांनी कोसळला. दरम्यान, शुक्रवारी संपलेला शेअर बाजाराचा आठवडा गेल्या दोन महिन्यांतील सर्वांत वाईट आठवडा ठरला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने गुंतवणूक काढून घेण्याचे सत्र सुरू आहे. तसेच जागतिक पातळीवरही फारसे उत्साहवर्धक वातावरण नाही. या दुहेरी संकटाचा सामना शेअर बाजार करीत आहे. त्याचा फटका शुक्रवारी बसला. वाहन, आरोग्य, बँकिंग, ऊर्जा, तेल व गॅस आणि टिकाऊ वस्तू या क्षेत्रांतील कंपन्यांचे समभाग घसरले.
सेन्सेक्सची सकाळची सुरुवात चांगली झाली होती. तो २८,८९२.२१ अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर त्याने आणखी वर उसळी घेत २८,९२२.८५ अंकांपर्यंत मजल मारली. ही वाढ नंतर सेन्सेक्सला टिकविता आली नाही. घसरणीला लागलेला सेन्सेक्स २८,६४७.१४ अंकांपर्यंत खाली आला. सत्र संपताना त्यात थोडी सुधारणा झाली. १३३.0६ अंक अथवा 0.४६ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २८,७१७.९१ अंकांवर बंद झाला.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ५0.६५ अंकांनी घसरून ८,६६१.0५ अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत ही घसरण 0.५८ टक्के आहे.
आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचे बाजार 0.१४ टक्के ते 0.८२ टक्के घसरले. चीन, हाँगकाँग आणि तैवान येथील बाजार मात्र 0.३५ टक्के ते १.९३ टक्के वर चढले. युरोपीय बाजारही सकाळच्या सत्रात मंदी दर्शवीत होते. जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन येथील बाजार 0.४२ टक्के ते 0.८५ टक्के खाली चालले होते. (वृत्तसंस्था)

४सेन्सेक्समधील ३0 पैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरले. ९ कंपन्यांचे समभाग वाढले.
४घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत टाटा मोटर्स, भेल, सन फार्मा, टाटा स्टील, एमअँडएम, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी, टाटा पॉवर, आयसीआयसीआय बँक, कोल इंडिया, ओएनजीसी, आरआयएल आणि सिप्ला यांचा समावेश आहे.

४बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. २,0१५ कंपन्यांचे समभाग कोसळले. ८५९ कंपन्यांचे समभाग वाढले. ९८ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल ३,१९४.१९ कोटी रुपये राहिली. काल ती ३,६९८.९५ कोटी इतकी होती.

Web Title: The Sensex fell by 133 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.