Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स २७४ अंकांनी घसरला

सेन्सेक्स २७४ अंकांनी घसरला

गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार घसरले.

By admin | Published: January 21, 2017 04:42 AM2017-01-21T04:42:37+5:302017-01-21T04:42:37+5:30

गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार घसरले.

The Sensex fell by 274 points | सेन्सेक्स २७४ अंकांनी घसरला

सेन्सेक्स २७४ अंकांनी घसरला


मुंबई : गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७४.१0 अंकांनी अथवा १ टक्क्याने घसरून २७,0३४.५0 अंकांवर बंद झाला. १0 जानेवारी रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८५.७५ अंकांनी अथवा १.0२ टक्क्यांनी घसरून ८,३४९.३५ अंकांवर बंद झाला. अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय यांचे समभाग घसरले. याशिवाय अदाणी पोर्टस्, टाटा स्टील, एनटीपीसी, एलअँडटी, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एमअँडएम यांचे समभागही घसरले. भारती एअरटेल, एशियन पेंटस्, आयटीसी, बजाज आॅटो, एचडीएफसी बँक यांचे समभाग वाढले. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: The Sensex fell by 274 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.